Skip to main content

राजकारण

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

पाणीवाली बाई!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 18/07/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्‍या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं. गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/07/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

आर्थिक अराजकता

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 26/06/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे. भारताचा विकासदर ९.५ टक्क्याहून(मार्च २००७) घसरून आता ५.३ टक्क्यावर(मार्च २०१२) आला आहे.

राजर्षी शाहू महाराज

लेखक अजातशत्रु यांनी मंगळवार, 26/06/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोक कल्याणकारी,आरक्षणाचे जनक,बहुजनांचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १३८ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य, कर्तुत्व, क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

अटरली बटरली.....

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 17/06/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
अटरली बटरली..... मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-) जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'! काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.