Skip to main content

राजकारण

भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 25/06/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही.

मध्य लटपटीत

लेखक ओंकारा यांनी रविवार, 21/06/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे. एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे.

मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 14/06/2015 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.

म्यानमार मधील कारवाई - काय सत्य काय खोटे?

लेखक सखारामगटणे यांनी शनिवार, 13/06/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे म्यानमार मध्ये झालेल्या कारवाईनंतर वेगवेगळे मतप्रवाह काही समर्थनार्थ काही विरोधात सुरू झालेत.त्यातच खालील लेख वाचनात आला: #56InchRocks becomes 50 Shades of Red: Modi's Obama moment in Myanmar unravels ह्या लेखामध्ये त्यानी खालील मुद्द्यांवर म्यानमार कारवाईची चिरफाड केली आहे
  1. आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
  2. Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू

आळी मिळी गुप चिळी!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

बाटली आणि दारू.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 23/05/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.