Skip to main content

मुक्तक

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 26/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

नवल - पुस्तक परिचय

लेखक पाटिल यांनी रविवार, 25/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
नवल. जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे.. फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं...

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

स्वप्नं

लेखक Gayatri Gadre यांनी सोमवार, 19/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

प्रिय मैत्रीण

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 16/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मैत्रीण, थोड्या उशिराच पत्र लिहितेय. पण याआधी तू पण बिझी असशील. कोणी ना कोणी तुला भेटायला येत असेल,सारखे फोन चालू असतील. कदाचित एका क्षणी तुला हे नकोस झालं असेल. मला कल्पना आहे. मीही त्यातून गेलेय. म्हणूनच या गदारोळात तुला हाक नाही मारली. सावकाश नि मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आवडेल मला. वरती मायना लिहताना पटकन मैत्रीण म्हटलं तुला. खरं सांगू का?, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखीच वाटलीस मला. वयाचं अंतर चांगलंच आहे आपल्यात. पण पहिल्याच भेटीत तू मला नावाने हाक मारायला सांगितलिस. तेव्हाच जवळची वाटलीस.

टिपूर चांदणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे
काव्यरस

शेवटची इच्छा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 23/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नल सतिश मिश्रा हे लष्कराच्या विमंडळात वैमानिक होते त्यांनी लिहिलेल्या एका (सत्य) कथेचा स्वैर अनुवाद शेवटची इच्छा आम्ही आमच्या तळावरून रुटीन ट्रेनिंग सोर्टीला निघालो होतो तेंव्हा मध्येच जेव्हा एलसी( प्रत्यक्ष ताबा रेषेवर) पोस्टकडे एक जखमी झालेल्या सैनिकाला (कॅस इव्हॅक) घेऊन जाण्यासाठी रेडिओ कॉल आला. तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेला तो तळ गाठला आणि लँडिंग करताना दिसणारे दृश्य असे होते. सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती .. चिंता, राग, भावनाकल्लोळ इ दिसत होते. शीख सैनिकांच्या तुकडीने त्यांच्या एका कनिष्ठ सैनिकाला घेरलेले होते.