समुद्र..
लेखनप्रकार
समुद्र ,सागर नजर टाकावी तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात. लाटांचा आवाज म्हणजे सागराच हृदयाची स्पंदने भासतात.अजूनही डोळे बंद करतातच कानात नादमधुर लाटांचे आवाज घुमतात.या आवाजात हळुवार फुंकर असते.सागर कितीही खोल असला.खूप काही दडलेल असलं तरी सागर किनाराच रम्य वाटतो.
शाळेत पुस्तकात शिकतांना सागर किनाऱपट्टी अगदीच कोरडाच वाटणारा शब्द ,त्याची भेट घेतल्याशिवाय समजत नाही हे नक्की.किनाऱ्यावरची रेती,खडकाळ दगड,माडाची झाड हे ह्याच वैभव आहे.कोकणातल्या लोकांचा मग खूप हेवा वाटतो.यांना कधीही समुद्राला भेटता येत नाही समुद्र हा त्यांचा अविभाज्य भागच असतो.
समुद्राची आणि माझी पहिली भेट शाळेतल्या सहलीला झाली.गणपतीपुळे येथील अगदी मंदिरातून थोड्याच अंतरावर याच दर्शन होत.मैत्रीणींच्या ओंजळीत खार पाणी भरभरून झेललं.स्टार फिशची रवानगी घरी झाली.मऊ रेतीत नाव कोरण्याचा मोह सर्वांनाच होतो.मग रेतीची घर बांधण, नाव कोरून शिंपल्यांनी सजवण असे ना ना छंद या रेतीच्या अंगणात जोडले जातात.पावलांचे ठसे उमटवलेले वेगाने लाटा पुसून जातात. लाटांच अनभिषिक्त हक्क त्या किनाऱ्यावर दाखवत असतात:).
पुन्हा समुद्राची भेट व्हायला फार काळ लागला.इल्लू इल्लू माझ पिल्लू जेव्हा धावू लागली,तेव्हा कोकणातील वळणावळणातील रस्ते कापत एक निर्जन बेटावर ह्याला मी भेटले.माझी पिल्लूला सांभाळत कवचधारक एक हात तिला तर दुसरा हात समुद्राला सांभाळत होता.लाटांना माझी जबाबदारक भूमिका फारशी रुचली नाही तिच्याशी मी समरसून गेलीच नाही.तिला येईन तुला पुन्हा भेटायला वचन देऊन मी गेले.
लवकरच तामसतीर्थ , लाडघर सागर किनारी सागर –लाटा आता मात्र मनसोक्त भेटल्या.समाधी घेतलेल्या साध्वीसम ठाण मांडून मी सागराच्या किनारी बसले.भिजून भिजून चिंब ना जगाच ना वेळेच भान राहील.हो सागराच्या या बेफान आवेशात मदहोश करणारी शक्ती असते.तेव्हा वाटलं पोहता येत असत तर सागराच्या तळाशी डोकावलं असत,ती शांती मनात साठवली असते.माथ्यावरचा सूर्य क्षितिजावर भगवे वस्त्र विणू पर्यंत लाटांशी खेळ चालू होता.केसांत अडकलेलं लाटांच पाणी रूप खुलवत होत.
सूर्य सागरात बुडणार ती कातरवेळ हुरहूर देते.तेव्हा अस्तित्वाचा क्षणभंगुर सत्य जाणवत.मग अलगद आपल्या माणसाचे हात हातात घेऊन अनेक शपथा घेतल्या.
रात्रीचा सागर किनारा चांदण्यांनी सजलेला .निजलेल लेकारुच भासत.
“सागर लाटांना झेलण
मनसोक्त जीवन जगण”
-भक्ती
वाचने
8071
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
समुद्र लिमिटलेस अनुभूतीच्या
In reply to समुद्र लिमिटलेस अनुभूतीच्या by गॉडजिला
हो,लिमिटलेस सकारात्मकता!
In reply to हो,लिमिटलेस सकारात्मकता! by Bhakti
शक्य आहे…
In reply to शक्य आहे… by गॉडजिला
छान!
समुद्र कायमच खुणावत आला आहे
मस्त.
सागर... समुद्र... समींदर...
वाह !
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा, प्राडॉ साहेब!
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समुद्र आवडत नाही असे
समुद्रकिनाऱ्याजवळ सगळं बालपण
In reply to समुद्रकिनाऱ्याजवळ सगळं बालपण by सोत्रि
रोमहर्षक!!!
आणखिनच गहिरं केलं, सर्टीफाईड स्कुबा डायव्हर होऊन! समुद्राखालचं जग निव्वळ भ न्ना ट!हेवा तर वाटतोच
हेवा तर वाटतोच