पूर्वसंचित
लेखनविषय:
होत खळाळता प्रवाह
नदीच्या अंगा खांद्यावर
इवलेसे मुलं होऊन खेळावं
होत चमचमता प्रकाश
रात्रीच्या नभ अंगणात
शुभ्र टिपूर चांदणं व्हावं
घेत मखमल अंगावर
घुटमळत मनाच्या पायरी
लाडकी मांजर व्हावं
मांडावं, पुसावे कागदावर
पुढच्या वळण वाटेचे
जुळवत हिशोब राहावं
पूर्वसंचित फुलपाखरे
बसता कमल मनी
गहिवर ऊतू जावा...
-भक्ती
१२/०१/२०२३
वाचने
2903
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सुरेख कविता
In reply to सुरेख कविता by प्रचेतस
धन्यवाद सागर.
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह सर!
भावना समजली,आवडली...
In reply to भावना समजली,आवडली... by कर्नलतपस्वी
कर्नलजी धन्यवाद.
आवडले.
आवडले.
आवडले.
प्रतिसाद अर्धवट प्रकाशित झाले.
In reply to प्रतिसाद अर्धवट प्रकाशित झाले. by जेपी
+१ धन्यवाद