Skip to main content

प्रामाणिक मत

शनिवार, 21/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात. याउलट तितकारा, तिरस्कार, घृणा , मत्सर हवा हे शब्द उच्चारतानाच जिभेची सुद्धा घालमेलच होते ना. मग प्रत्यक्षातल्या अनुभवांचे काय. एखाद्याचा तिटकारा, तिरस्कार करणे, घृणा वाटणे, मत्सर किंवा हेवा करणे या सर्व भावनिक व्याधींच्या आधीन आपण का व्हावे? हां तर प्रत्यक्षात स्वत:चाच आजार. ज्या व्यक्तीचा आपण तिटकारा करतो, हेवा करतो त्यात त्या व्यक्तीचा दोष किती व स्वत:चा किती त्याचा आपण साधक बाधक विचार केल्यावरच आपण किती टक्के बरोबर आहोत हे लक्षात येईल.तो विचार करताना आपण शंभर टक्के निपक्षपाती आहोत याचेसुद्धा स्वपरीक्षण करूँ घेणे जरुरीचे आहे. हे सर्व झाल्यावर ज्या व्यक्तीशी आपण असे वर्तन करतो ते कितपत योग्य हाही विचार करावा व त्याचा समोरच्या व्यक्तीवर, त्याच्या मानसिक स्थितीवर आपण कितीसा घाला घालतोय अणि ते स्वत:स किती शोभायमान आहे याचा किंचितसा तरी उहापोह करावा असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्याला न आवडणारी, न चालणारी , न भावलेली किंवा अपेक्षित नसलेली, नको असलेली गोष्ट अनेक वेला अनेकांच्या हातूनही होत असेल म्हणून त्याचा चांगल्या/योग्य शब्दात ही उलगडा करता येतो न? मग तसे का करू नये ? अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्ती व नातीगोती ते शेजारपाजार, समाज आशा सर्वच क्षेत्रात आपला अन्य व्यक्तींबरोबर कधी भावनिक तर कधी व्यावहारिक संबंध येताच असतो.प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपण कितीसे समतोल राहू शकतो त्याची परीक्षाच असते म्हणा ना. तेव्हा चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकू असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3658
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सासूबाईनी लिहिलेला लेख टाकलेला आहे. "इंद्रधनुष्य" या आया डी वरुन त्या लिखाण करतील. धन्यवाद.

मिपावर 'इंद्रधनुष्य' यांचं स्वागत. छोटेखानी असला तरी लेख विचारप्रवर्तक वाटला, विशेषतः चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकू हे अनुभवाचे बोल नवं वर्ष सुरू होता होता विचारांना नवीन दिशा देऊ शकतील. आणखी विस्ताराने असं लिखाण वाचायला आवडेल.

In reply to by बहुगुणी

बहुगुणी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आईंना मी मार्गदर्शन करत आहे. बहुधा त्या नेटाने शिकतील. कृपया सांभाळून घ्यावे.

नमस्कार. मिपावर तुमचे स्वागत आहे. अगदी आदर्श आणि संवेदनशील विचार बैठक आपल्या सकारात्मकतेचे फायदे आपल्याला मिळवून देतेच. जगण्यात एक निरंतर शांतता लाभते. 'संयम' हाही असाच एक गुण आहे. स्वतःच्या संतापाला आवर घालणे, शाब्दिक वार टाळणे, प्रसंगी तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करण्यासाठी थोडा विचार घेऊन संयमित शब्दात आपला मुद्दा मांडणे हेही महत्त्वाचे. वादात जिंकण्यापेक्षा नाते सांभाळणे जास्त महत्त्वाचे. अर्थात हे सोपे नाहीच. असिधाराव्रतच म्हणाना. पण प्रयत्नसाध्य आहे.

अनेकदा बरोबर काय हे माहित असतं, पण मूळ स्वभाव तसं वागू देत नाही. विचार आवडले. मिपावर स्वागत आहे. लिहीत रहा.

इंद्रधनुष्य यांच स्वागत. पहिल्याच लेखात त्यांनी आपले अनुभवसिद्ध विचार सुसंगतपणे चांगले मांडले आहेत. 'मूळ स्वभाव तसं वागू देत नाही' हे पैसा यांचे निरीक्षण किंवा अनुभव हीच यातली ग्यानबाची मेख असते. द्वेष, मत्सर, तिटकारा वगैरे कोणी ठरवून करत नाही आणि तो करता येणारही नाही. या भावना नैसर्गिकपणे मनात उठतात. याच्या मागेसुद्धा निसर्गाची काही रचना असणार. हा माणसाच्या डिफेन्स मेकॅनिझमचा भाग असावा. मूळ स्वभाव तरी मुळात कुठून येतो? त्याला काही कारणे असतात. तेव्हा चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर त्या मूळ स्वभावाला थोडी मुरड घालता येईल. आपले जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याच्या प्रयत्नामुळे ते आज धावपळीचे वेगवान बनले आहे असे मला वाटते. त्याचा द्वेष, मत्सर, तिटकारा वगैरेशी काही सबंध नसावा.

In reply to by आनंद घारे

मुळ स्वभावानुसार नैसर्गिक रित्या चान्गल्या अगर वाइट भावना मनात येतात .हे आपण म्हट्ल्याप्रमाणॅ स्वाभाविकच आहे पण ह्यात चान्गल्या भावना जोपासुनवाइइट भावनाना आपण मुरड घालावि या करीता हा उहापोह.