
शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते?,फॅन्ड्री असे लहानपणीच्या कोमल?;) प्रेमाचे सिनेमा मराठीत असताना परत आत्मपॅम्फ्लेट त्याच बालवयातील प्रेमाचा सिनेमा कशाला पाहायचा अस ठरवल होतं.पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मस्त गोडधोड खाऊन बसले तर हा चित्रपट घरच्यांनी लावला होता.
'काय भावांनो' असं जबरदस्त चढाच लहान मुलांचा दंगा करणारा घोळका दिसतो.साधारण ८० च्या दशकातल्या काळात सिनेमा सुरू होतो.पणजी ,आजी , आजोबा इतर सगळे भरलेले घर दिसतं.शाळेत भेटलेले मित्र आणि त्यांचे समाजातील नियमांविषयीचे असंख्य प्रश्न आहेत.
मित्रा मित्रांची मैत्री घट्ट होत असतानाच 'जात' नावाचं लेबल सगळ्यांचं वेगळं असतं आणि ते घरच्यांनी आपल्याला दिलंय हे त्यांना लक्षात येतं.
पण तरीही हे तकलादू आहे हे वेळोवेळी अतिशय हलक्याफुलक्या नर्मविनोदी प्रसंगांनी हे मित्र लोक दाखवून देत असतात.त्यात सिनेमात प्रेमाचा अंकुर परजातीय हिरो- हिरोईन मध्ये फुलतोच.अशा या प्रेमात एकतर्फी प्रेमाकडून समोरच्या फुलपाखराचा होकार येईपर्यंतचा प्रवास आत्मपॅम्फ्लेट आहे.
अनेकदा व्हिलन जातीयवादच दाखवला आहे.पण परेश मोकाशी यांनी कथेतून काहीतरी वेगळ्याच भन्नाट प्रयोगाने ,मांडणीचे खुसखुशीतपणे या विखाराचा फोलपणा दाखवला आहे. अखेरीस नायकाच्या , नायिकेच्या पाल्यांच्या सूज्ञपणा पाहून थक्क होतो,पण शेवटी एलियन पाहून दिग्दर्शकाला काहीतरी सूचित करायचे आहे हे दिसत आहे.
सिनेमा पाहतांना मला शाळेचे नाही पण महाविद्यालयाचे दिवस आठवले, माझ्याही मनात समाजाविषयी असे असंख्य प्रश्न असायचे.मी माझ्या पुरता गुंता सोडवायला घेतला आणि सोडवला.
आत्मपॅम्फ्लेट हा एक वेगळ्याच धाटणीचा सिनेमा आहे.
-भक्ती
चांगलाय सिनेमा.
In reply to चांगलाय सिनेमा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिनेमा अद्याप बघितला नाहीये,
या सिनेमाला वेळ दिला तर तो कारणी लागेल.
कुठे बघायला मिळतो हा चित्रपट
In reply to कुठे बघायला मिळतो हा चित्रपट by धर्मराजमुटके
Zee5
आत्मपॅम्फ्लेट सिनेमाच्या पुढे