Skip to main content

मुक्तक

पूर्वेच्या समुद्रात- १

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 10/11/2014 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे.

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा

चहा, सिगरेट आणि गप्पा - थंडी

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 31/10/2014 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
हाताची चार बोटं वर करून न बोलताच जोश्या नि ऑर्डर दिली. "कसली थंडीये …. " यंत्रमानवाच्या आवाजात कुडकुडत जोशी म्हणाला. "मिष्टर झिरो फिगर … अंगावर थोडी तरी चरबी जमवा … एवढी पण थंडी नाहीये … " "च्याक… पहिल्या सारखी थंडी नाही राहिली … " चहा आला.

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

शब्दांशी दोस्ती

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 20/10/2014 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनीच जर मैत्री करायची तर शब्दाना कशाला प्रौढ करायचे कशाला द्यायची त्यांच्या हातात पंतोजीची छडी नि उगाच आजोबाची काठी एवढ्या जुन्या पिंपळ वृक्षाला फुटतेच ना नव्याने पालवी केशरी छटा असलेल्या कोवळ्या पानांनी वृक्ष जातोचना सळसळून पोपट करतातच न मुक्काम भर रात्री त्यांच्या फांदीची उशी करून झाडांना कशी स्वप्ने पडतात उद्याची मग कशी दिसते त्यांच्या अंगावर नव्याने फुलून गेलेली कोवळी पालवी नव्याने दिसतेचना आभाळ नव्याने जमतातच ना ढग तोच पाउस प्रत्येकवेळी नव्याने बरसून जातो मातीचा तोच गंध नव्याने जाणवून जातो पहाटचा सूर्य नव्यानेच सापडून जातो मैत्रीत आपले शब्दही सतत असावेत

जडण-घडण 12

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 17/10/2014 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट.

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/10/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही.

"काही नाही… "

लेखक योगी_१९८५ यांनी गुरुवार, 09/10/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

माझ्या शेल्फवरची पुस्तके...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 08/10/2014 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
जमवून जमवून गोळा करून मांडून ठेवलेली असतात पुस्तके माझ्या पुस्तकाच्या खास शेल्फवरची संदर्भ ग्रंथासकट काही कवितेची मी चाळत रहातो मला हवे तेव्हा हवी तशी मी फिरत असतो पुस्तकाच्या रानात अक्षरांच्या ओळीओळीतून मनसोक्त फिरत राहतो घुसतो शब्दांच्या निबिड रानात मला हवा तो मोसम सुरु होतो जेव्हा माझ्या हातात पडतात मला हवे ते शब्द जादू करतात मनावर भ्रमित करतात मला मग कोसळू लागतो पाऊस मी शब्दांच्या पावसात भिजून जातो नको ईतका माझ्या बेड रूमची खास खिडकी मी काढून टाकल्यात त्या दुधी काचा नि बसवल्यात शुभ्र पारदर्शक ज्यातून सकाळचा सूर्य अलगद येतो भेटीला सांडतो प्रकाश माझ्या पुस्तकावर मग ती मला

ते काळे अभद्र आभाळ …।

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 06/10/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
[अशी म्हातारी माणसे दिसतात . आज सकाळीच बघितली जोडी . वाचनालयात आणि हळू हळू घराकडे परतताना .नव्वदीच्या तरुणाचे ते लुकलुकनारे डोळे बघून ,आणि त्या पंच्याशी वय असलेल्या गम्भीर स्त्री कडे जिच्या हातात एक पुस्तक होते पानगळ सुरु आहे ह्या पानावरून चालत असताना हे सुचून गेले ] तिचा नव्वद वर्षाचा नवरा तिच्या पंच्याशी वर्षाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेऊन चालत असतो तेव्हा तो नसतोच नव्वद वर्षाचा त्याच्या अधू डोळ्यांना नाहीच दिसत तिचे थकून गेलेलं नि लोंबणारे, ओघळलेले शरीर ….