"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती.
"इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक.
.
.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अॅक्शन रिप्ले.
"तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?)
"असंच, मला माहिती आहे." थोरली पाती.
"अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?"
"गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो."
.
.
वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच. आम्हालाही नवीन पिढी कोणत्या जगात वावरते हे कळते.
.
.
"आधी मला सांग देश म्हणजे काय?" मी. उगाचच शहाणपणा.
"अम्म्म... भारत."
"भारत म्हणजे काय?"
"अम्म... देश"
"भारतदेश म्हणजे काय?"
"अम्म्म्म्म्म्म्म्म........ नाशिक"
"बरं." जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. देश काय हे समजण्याचं वय नाहीये हो. चला पुडं.
"अपमान म्हणजे काय?" ह्यात तरी त्याला नक्की काय समजलं हे समजायला हवं.
"अम्म्म्म.. त्रास!"
"हां... ठिक आहे."
.
.
.
"बरं, मग केव्हा म्हटलं पाहिजे जन-गण-मन तू सांग?" अस्मादिक.
"ताई सांगतील तेव्हा. शाळेत."
"..............."
.
.
.
खरं तर माझ्याकडे तन्मयला सांगायला खूप काही आहे. पण मी गप्प आहे.
.
.
देशभक्ती, देश, मान-अपमान, राष्ट्रगीत, काय कुठे केव्हा कसे म्हणायचे, कोणाचे ऐकायचे, नाही ऐकायचे, स्वातंत्र्य म्हणजे काय, अधिकार, कर्तव्ये, इत्यादी इत्यादी.
खूप बोजा आहे हो देशाचा नागरिक असण्याचा! एवढ्या लवकर कुठे?
.
.
सध्या मनाच्या आभाळात सृजनाची पाखरे भीरभीरतात. इवल्याशा खांद्यांवर कोवळ्या स्वप्नांचा भार पुरेसा आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7739
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय, सध्या नकोच! तसंही आजकाल
दंगल मध्ये जेव्हा गीता जिंकते
डांगे भाऊ ,
आपल्या देशात एकूणच
सहमत आहे! राष्ट्रभक्ती
In reply to आपल्या देशात एकूणच by थॉर माणूस
क्युरियस केस
In reply to सहमत आहे! राष्ट्रभक्ती by हतोळकरांचा प्रसाद
बसाकी फेदरवेटसाहेब, आपलं तर
In reply to क्युरियस केस by फेदरवेट साहेब
सन "मला बसायचा हाय" असा आपुन
In reply to बसाकी फेदरवेटसाहेब, आपलं तर by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही फेदरवेट आहात की
In reply to सन "मला बसायचा हाय" असा आपुन by फेदरवेट साहेब
ते फेदरवेट पेस्तनकाका असू
In reply to तुम्ही फेदरवेट आहात की by पिलीयन रायडर
ओके! म्हणजे ते "कोनला बी"
In reply to सन "मला बसायचा हाय" असा आपुन by फेदरवेट साहेब
जसं बसून अशा माणसाने आपला
In reply to ओके! म्हणजे ते "कोनला बी" by हतोळकरांचा प्रसाद
साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही
In reply to जसं बसून अशा माणसाने आपला by संदीप डांगे
साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही
In reply to साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही by हतोळकरांचा प्रसाद
(लांब प्रतिसादाबद्दल क्षमा
In reply to साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही by संदीप डांगे
when in the course of a
In reply to (लांब प्रतिसादाबद्दल क्षमा by हतोळकरांचा प्रसाद
माझी मानसिकता वगैरे
In reply to when in the course of a by थॉर माणूस
ज्यांना उभं रहायचयं ते रहातील
<<<< आणि मुख्य म्हणजे जो
In reply to ज्यांना उभं रहायचयं ते रहातील by मराठी कथालेखक
असं काय करता राव!
In reply to <<<< आणि मुख्य म्हणजे जो by विशुमित
हो का! राष्ट्रगीताला उभे
In reply to असं काय करता राव! by संदीप डांगे
चिडायला काय झालं?
In reply to हो का! राष्ट्रगीताला उभे by हतोळकरांचा प्रसाद
:):) सांगितलं ना डांगेसाहेब,
In reply to चिडायला काय झालं? by संदीप डांगे
शेवटचा परिच्छेद छान आहे.
छान लिहिलंय
खरं आहे तुमचं म्हणणं,
राष्ट्रगीताला मान दिलाच पायजे
बघा पटतंय का
दंगल चित्रपटात जेव्हा मध्येच
एक सुंदर व्हिडियो!