Skip to main content

मौजमजा

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 08/03/2012 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.

भांग का रंग जमा हो...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/03/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-)) तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव.. मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता.

साजन चले ससुराल........

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 02/03/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
या घटेनेला आता दिड दोन वर्षं होतं आली. आजतागत हे गुपीत माझ्या बायको आणि मेव्हणी व्यतिरिक्त कुण्या चवथ्या व्यक्तीस माहित नाही. तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेची कृपया बाहेर कुठेही वाच्यता करु नका. मागच्या सुट्टीत एका भल्या पहाटे तांबड फुटायच्या आत अस्मादिकांच विमान मुंबापुरीत येऊन दाखल झाल. संपुर्ण विमान प्रवासात कधी नव्हे ते यावेळी राम नामाचा जप चालू होता. (कर्टसी गवि.) पुर्वी विमानतळावर जाताना वा तिथुन येताना नातेवाईक सहकुटुंब सोडायला/घ्यायला येत. पुढे पुढे माझ येण्या जाण्याच प्रमाण इतकं वाढलं तस रोज मरे त्याला कोण रडे.

अमृतानुभव

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 01/03/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशित) स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो. कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले.

" आज मराठी भाषा- दीन ! "

लेखक विदेश यांनी सोमवार, 27/02/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
काव्यरस

((मी सदस्य होणारच!))

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 23/02/2012 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे.