वस्स्स्सकन् !!
लेखाखालच्या प्रतिसादातून वस्स्सकन् कुणीतरी अंगावर आले..
कुणीतरी चार डोक्यांनी विचार करणारा हेडटाईट असणार..
डोळ्यात चरचरीत अंगार आणि मनात झगझगीत शब्द आले..
वावराच्या नियमांनी चाप लावलेत म्हणून ते किबोर्डावरच खळखळ झाले आणि पुसले गेले.
पुन्हा पुन्हा डोक्यात जाणारा वसवसता प्रतिसाद
कोण साला घुसतोय नसत्या जंगलात.. उडतोय खालीपाली कुठच्या कुठे ** चा..
साध्या लेख, कवितावर अगदी शष्प पदार्थावर हॅलोजनच्या प्रकाशासारखी अक्कल टाकून शायनिंग मारतात...
व्यंकट बुद्धीची पैदास ** ची...
प्रोफाइल उघडून नीट पाहिलं तर तो स्वत:च मालकांपैकी एक होता..
मग मी गपगुमान खाली मान घालून लॉग आऊट केलं आणि चालू पडलो..
मिसळपाव
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.
