[या बातम्यांचा मुख्य उद्देश विनोदनिर्मिती नसून फक्त रिपोर्टींग आहे. एक टैम्पास कल्पना म्हणून आनंद घेणेत यावा इति विज्ञापना.]
नमस्कार!
मिपा बुलेटिनमध्ये सादर आहेत आजच्या ठ्ळ्ळ-क* बातम्या (*मनसेच्या खळ्ळं-फट्याक सारखं हे ठ्ळ्ळ-क वाचावं)
भानामतीचा फेरा कायम
विंगकमांडर ओकांनी आजही भानामतीचा फेरा कायम राखला. अंनिस ही कुठल्याही भोंदु बाबा इतकीच भोंदु संस्था आहे या त्यांच्या मताचा ओकांनी आज पुन्हा एकदा येथे पुनरुच्चार केला. गवि वगैरे सदस्यांनी अंनिस एकदाची हरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे; तर ननि यांनी भानामतीचे लेख सतत पडत असल्याने एखाद्या स्थळाचा किंवा आयडीचा बळी द्यावा लागेल अशी भीती बोलून दाखवली. नट्यांच्या अंगावरील कपडे गायब असण्यामागे भानामतीच असावी असा संशय अनेक सदस्यांनी बोलून दाखवला. यावर विंगकमांडर ओक गालातल्या गालात हसुन भानामतीवरचा नवीन लेख लिहायला बसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
धर्म-जातहिन होण्याचा हक्क असावा: हुप्प्या
धर्म किंवा जातीचा कायदेशीर त्याग करता येणार नसल्याचा निर्णय नुकताच एका न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर हुप्प्या यांनी उडी घेतली. हुप्प्या यांनी धर्म-जातीचा त्याग करु न देण्याचा हा प्रकार मूर्खपणाचा आहे काय यावर चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात मिका यांनी संविधानातील कायद्यांच्या आधाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला यावर हुप्प्या यांनी संविधान हा धर्मग्रंथ नसून त्यात बदल संभवतात असे जोरदार प्रतिपादन केले. हे चर्चासत्र मध्येच सोडून जाऊन मूकवाचक यांनी सर्व मानव प्राण्यांनी जात धर्माचा त्याग करुन केवळ 'सस्तन प्राणी' म्हणवून घ्यायला हवे असे उद्विग्न मत व्यक्त केले. अनेक नामवंत सदस्यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.
मेणबत्ती व टोपीबाजीवरुन कहर
नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीकडे मेणबत्तीप्रेमी व टोपीबाजांनी पाठ फिरवली. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन कॉमन मॅन यांनी केले. या प्रतिपादनावर अनेक सदस्य उखडले असून ननि यांनी कॉमन मॅन असले धागे टाकण्यापूर्वी कॉमन सेन्स वापरत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. चिडलेल्या ननिंकडे तिरक्या नजरेने पाहून कॉमन मॅन यांनी मनसे-सेनेच्या संभाव्य युतीवर हळूच धागा टाकला. संपादक मंडळाने हस्तक्षेप करुन हा धागा वेळीच बासनात गुंडाळला. कॉमॅंच्या या धाग्यावर रिवाजाप्रमाणे मतमतांतराचा धुराळा उडाला. त्या धुरळ्यावरच 'मेणबत्त्या-टोप्या-टोप्या-मेणबत्त्या' उसळत राहिल्या आणि नवे लेखन तपासणार्यांच्या डोक्याला शॉट लागला. एकूणच कॉमन मॅन हा मिपासाठी चिंतेचा विषय बनत असल्याची कुजबूज सुरु झाली आहे.
चिमण्या हद्दपार होणे क्लेशकारक : लिना शेडसाळे
मोबाईल क्रांतीपूर्वी लाखोंच्या संख्येने आढळणार्या चिमण्या आज नामशेष होत आहेत. मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या पक्ष्याचे नामशेष होणे क्लेशकारक असल्याचे मत शेडसाळे यांनी व्यक्त केले. शेडसाळेंनी व्यक्त केलेल्या या मतावर गविंनी चिमण्यांना रहाण्यासाठीच्या पेट्यांचा उपाय सुचवला. अनेक सदस्यांनी चिमण्या आजही अस्तित्वात असून त्यांच्याबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचे गवि म्हणाले. चिमण्यांचा धागा पाहून प्रकाश यांनी कावळे उडवून पाहिले - पण ते फुसके निघाले.
सडाफटिंग पाकसिद्धीवर पब्लिक खूश
विमे, प्रास आणि गवि यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका दूरस्थ स्थळी सडाफटिंग पाकसिद्धीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी तिघांनीही आपापल्या पाककौशल्याचे दर्शन घडवले - ते दर्शन झाल्यानंतर कित्येक सदस्यांनी इनो घेतल्याची कबुली दिली आहे. अशा सडाफटिंग पाकसिद्धी बैठका होण्याची नितांत गरज असून पुढील पाकसिद्धी इंदुरच्या आसपास होईल अशी चिन्हे आहेत.
भाजे लेणीतील गूढाचा उलगडा होणार
मिपाचे इंडियाना जोन्स वल्ली यांनी नुकतीच भाजे येथील लेण्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना लेणीत आढळलेल्या गूढाबद्दल अभ्यासपूर्ण शैलीत विवेचन केले आहे. लेणीतील गजमूर्ती कोणाची आणि तिचा काळ नेमका कुठला या मुद्यांसह वल्लींनी प्राचीन लेणीनिर्मितीकडे लक्ष आकर्षित केले. यावेळी चित्रा यांनी लेणीतील गजमूर्ती प्रसेनजीत व अजातशत्रूची असेल असे मत व्यक्त केले. यासंदर्भात वल्ली व चित्रा यांच्या दरम्यान रंगलेल्या संवादाचा वाचकांनी आनंद घेतला. वल्ली यांच्यावर हौशी इतिहासप्रेमींना लेण्यांमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी आल्याबद्दल मत विचारले असता त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या.
पाभेंना झाली गावाकडची आठवण
आज पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांना गावाकडची आठवण झाली आहे. मुक्तछंदात केलेल्या या काव्यात त्यांनी गावाकडचे चित्र जीवंत केले असून ते पाहून अनेक सदस्य गावाकडे निघाल्याचे कळते.
टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ प्रतिष्ठान तर्फे आमचेकडे पेस्टवण्यासाठी आलेला असुन आम्चा यात व्यक्तिशः कुठेही हात अगर लेखणी नाही...तसे काही यक्कू प्रतिष्ठान व अन्य कुणाला वाटल्यास तो एक वैचारिक योगायोग समजावा ;-)
वाचने
10559
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
यक्कू प्रतिष्ठानचे हापिसामधुन
२ न्युज राहिल्या...
+१
In reply to २ न्युज राहिल्या... by वपाडाव
@यशोधन वर्तक यांचे मिपावर
In reply to २ न्युज राहिल्या... by वपाडाव
+१
दर आठवड्याला हे सदर चालवावे
In reply to +१ by हंस
भले...भले!
@यक्कु..
मस्त
>.> टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ
@ही देखील एक महत्त्वाची बातमी
In reply to >.> टीपः-सदर लेख यशवंत एकनाथ by आशु जोग
एकूण मजा आहे तर ! संतोष
In reply to @ही देखील एक महत्त्वाची बातमी by अत्रुप्त आत्मा
भन्नाट...
आधी बुधवारच्या कविता होत्या
काय ५०
In reply to आधी बुधवारच्या कविता होत्या by ५० फक्त
टिट्..टिट्..टिट्..टिssssट्...
ह्या ममिसळपाव मिसळपाव
In reply to टिट्..टिट्..टिट्..टिssssट्... by पाषाणभेद
@त्यादरम्यान अत्रुप्त आत्मा
In reply to टिट्..टिट्..टिट्..टिssssट्... by पाषाणभेद
____/\____ कहर....! यकु आणि
अजुन काही
In reply to ____/\____ कहर....! यकु आणि by प्यारे१
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो
In reply to अजुन काही by अन्या दातार
मुठभेड
In reply to हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो by गवि
_____/\____ कहर आहेत
In reply to हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो by गवि
हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो
In reply to हिंदीत ब्रेकिंग न्यूजना जो by गवि
छान छान
दर बुधवारी हे बुलेटिन
भन्नाट पोस्ट
हहपुवा
एकनाथ, गवि आणि पाभे .. जबरीच
=)) =)) =))
+१
In reply to =)) =)) =)) by पैसा
झक्कास..
.
काहीतरीच ...छे, छे.. ही तर भानामतीच झाली की
=)) मस्तच