Skip to main content

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

हाबिणंदण

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 26/11/2014 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...

वाहन वेड्यांसाठी: २०१४ मायामी बीच इंटरनॅशनल ऑटो शो

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 24/11/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?' तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती.

मला पडलेले काही (गहन) प्रश्न

लेखक सुनील यांनी मंगळवार, 18/11/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांना प्रत्यही अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळून जातात तर काही तसेच मनात पडून राहतात. माझ्या मनात पडून राहिलेल्या अशाच काही प्रश्नांची ही जंत्री. मी त्यांचे वर्गीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे (जित्याची खोड!). वर्ग १ - वर-खाली शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर? एखाद्या देशातील बहुसंख्य जनतेच्या ह्या सवयीचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काही संबंध जोडता येईल काय?

छायाचित्रणकला स्पर्धा ४ प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 16/11/2014 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील चौथं पुष्प, विषय 'उत्सव प्रकाशाचा' या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

अजुनी बसून आहे

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 07/11/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..
काव्यरस

एकदा तरी पहावा असा.

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 31/10/2014 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे. नमन झाल्यावर आता मुळ विषयः डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला. सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतल

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 17/10/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......