Skip to main content

मौजमजा

एका पक्ष्याचे प्रकाशचित्र

लेखक लिखाळ यांनी रविवार, 27/07/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मागच्या नोव्हेंबर मध्ये महाबळेश्वर येथे फिरायला गेलो असता एका तारेवर छान पक्षी दिसला. बर्‍यापैकी लहान होता पण उन्हात असल्याने त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही. कसा वाटला ते सांगा. कॅमेरा निकॉन कूलपिक्स एस ४. १०पट झूमचा. पक्षी फार लांब असल्याने चित्र स्पष्ट असले तरी आकाराने लहान झाले आहे. फोकल लेंग्थ ६३ मी मी ऍपरचर १/४ शटर १/१७० आयएसओ ५० पक्षी थ्रश या प्रकारातील असावा असे वाटते. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे. -- (पक्षीमित्र) लिखाळ.

(माउस)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 24/07/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

तहान !!

लेखक निसर्ग यांनी गुरुवार, 24/07/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बघा ही मनी पिते कशी पाणी

लोकसभेतील चर्चा

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 23/07/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकतेच एका इंग्रजी लेखकाचे एक 'क्रिप्टिक' वाक्य वाचले. ते खाली दिले आहे. Parliament is so strange. A man gets up to speak and says nothing. Nobody listens..... and then everybody disagrees. पार्लमेंट ही किती अजब जागा आहे! एक सदस्य बोलायला म्हणून उभा राहतो. कांहीच (महत्वाचे) सांगत नाही. कोणीसुध्दा (तो काय बोलतो आहे ते) ऐकत नाही ....... आणि सारेच त्याच्याशी असहमत होतात. काल आणि परवा आपल्या लोकसभेच्या खास अधिवेशनाचा 'आँखो देखा हाल' पाहतांना ते वचन पुन्हा पुन्हा आठवत होते.

(मोरपिशी साडी)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात.... लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून, ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या पाचफुटी फुला.... उगीच का अत्तर लावतोस? तुझ्या या मोरपिशी साडीनंच "अत्तर शिंपडलंय या देखाव्यात'' निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं... आणि तांबूसकाळ्या बटांमागचं.. कानावरचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सुगंधाचा कळस! आहा... ! डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून. बर आहे..., तू घरात आहेस!, असाच राहशील कायम... असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य, तुझं कोवळे पण.. तुझी मोरपिशी साडी! न विस्कटता , न कोमेजता! प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

(लाडू सांगे...)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे आता, बास । कवितांची रास । किती किती त्रास । कवींचा या । । पाहवेना नेत्री । रात्री अपरात्री । कवितांना कात्री । लागलेली । । पुरे दादागिरी । आता माझी बारी । वदतो अंतरी । विडंबक । । इरसाल स्वारी । बसे खाटेवरी । पुंगी वेळेवरी । वाजवाया । । 'काळा' की 'कावळा' । 'प्रेम' की 'पाचोळा' । भरल्या मी चुळा । कल्पनांच्या । । कवितेचा घास । करुनिया खास । सोडला उपास । लेखनाचा । । ओळींना वळण । शब्दांचे दळण । करितो कांडण । कवितांचे । । शिव्यांचाही भार । घेई शिरावर । खरा गुन्हेगार । कवितेचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळावं ?

(बैल)

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 18/07/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो ;) बायकोच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो :( आपण सगळेच बैल असतो आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

लेखक पुष्कर यांनी रविवार, 13/07/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.