मिपा - अभिरूची कट्टा....
लेखनप्रकार
आज सकाळी ११ वाजता सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मार्ग) 'अभिरुची बागेत' भेटायचे ठरले होते. धमाल्याचा तसा ऑफिशियल फोनच आला होता. मी तर जाम उत्सुक होतो. ठीक ११ वाजता 'अभिरूची'ला धडकलो. सामसूम. ठार शांतता. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी जाणं आणि इतर सदस्य न आल्याने अर्धा-एक तास लटकणे हे नेहमीचेच. माझे आणि बायकोचे ह्यावरून अनेकदा 'सुखसंवाद' झाले आहेत. (म्हणजे 'सुख' तीला मिळते, मी नुसता वादाचा धनी). तर तिथे कोणीही (मिपाकर) न आल्याने वातावरण तापू लागले होतेच. तेवढ्यात एक जण कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला/ऐकला. 'हॅलो! अरे मी मनोबा बोलतोय्... हो मी पोहोचलोय्....बरं! बरं...' फोन बंद. हा मनोबा म्हणजे मिपावरील मनोबा तर नाही? मी विचार करत होतो. मीही धमाल्याला फोन लावला, 'अरे काय आहात कुठे? आम्ही पोहोचलोय अभिरुचीला.' हो.. हो .. काका मी निघतोच आहे. तिथे शेखर आलाय का?' 'कोणीही आलेले नाही' मी अम्मळ रागावून. 'येईलच काका तो एवढ्यात, मीही निघतोच आहे.' म्हणजे हा गधडा आत्ता घरून निघतोय. च्यायला ताप आहे. तेवढ्यात तो मनोबा की कोण माझ्या दिशेने आला. स्वतःची ओळख करून दिली. मीही माझी ओळख करून दिली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पुणेकर, मुंबईकर, भारतीय राजकारण, इंटरनॅशनल राजकारण आणि काय काय बोललो. सगळे विषय संपले पण कोणी आले नाही. अर्थात त्यामुळे न आलेल्यांचा उद्धार सुरू झाला. (माझ्याकडून हं! मनोबा बिचारा गुणी आहे). तेवढ्यात शेखर आला. बरोबर विनायक पण होता. तसे आम्ही पुढे झालो. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. येणार्यांसाठी ताटकळत न बसता आपण आपले आत (बागेत) सरकू असा ठराव उभ्या-उभ्या पास केला आणि आम्ही 'अभिरूचीत' दाखल झालो.
नंतर 'छत्रपती' आले, यमी आणि अभीर आले. आनंदयात्री, श्री व सौ धमाल आले. (धमाल्याची पँट मस्त होती बुवा, आवडली आपल्याला). स्वाती राजेश, इनोबा, प्रकाश घाटपांडे वगैरे सर्व जमले. थोडे उशीरा आले पण विजूभाऊसुद्धा पोहोचले. सुरुवातीला आम्ही जवळच्याच खाटल्यांवर बैठका मारून निवांत गप्पा मारल्या. नविन आलेल्यांना आधी ओळख पाहू कोण कोण, कोण कोण आहेत ते असे सांगून आमची स्वतःचीच करमणूक करून घेतली. अशी थोडीफार मजा मजा केल्यावर चहाची तल्लफ आली . (ती दर तासातासाला येतेच म्हणा). पण त्या कित्येक एकराच्या बागेत चहा मिळत नाही ही आमच्या ज्ञानात भर पडली. पुन्हा कधी तिथे गेलात तर सोबत चहाचा थर्मास (भरलेला) घेऊन जा, नाहीतर पंचाईत होईल. शेवटी आंद्याने, धमाल्याने तिथल्या स्वयंपाक घरात कोणाच्या तरी हातापाया पडून १४ कप चहा मिळवला. देव त्यांचे भले करो.(नाही केले तर सांगा मला, बघतोच मी त्याच्याकडे. {आणखिन काय करू शकणार मी पामर}) असो.
पुढचा कार्यक्रम 'कठपुतळी नाच.' अर्थात लग्नानंतर मला तरी त्यात काही नाविन्य राहीले नव्हते. पण अविवाहितांना त्यातही गंमत वाटते. त्या पुतळ्यांचे दु:ख त्यांना काय ठावे? असो. कार्यक्रम तसा विनामुल्य होता, मजा आली. राजस्थानी नर्तकी चमेलीबाई आपला घागरा वर करून (मर्यादीत स्वरूपात) नाचून गेली, पाठोपाठ हृतिक रोषन आपल्या धडावर हलक्या हाताने बसविलेली मान दोन्ही हातांनी (प्रसंगी पायांनीही) धडापासून २ फूट वर उचलून दाखवून गेला. समाजात मान उंचावणे म्हणजे काय मला आज कळले. नंतर चक्रम घोडेस्वार आला. कधी तो घोड्यावर बसून उड्यामारायचा कधी घोडा त्याच्या पाठीवर बसून उड्या मारायचा. तसेच त्या गारूड्याचे. एनिवेऽऽऽ काहितरी टाईमपास हवाच होता. कठपुतळीचा खेळ संपल्यावर आम्ही जादूचे प्रयोग करणार्याकडे वळलो. थोडेफार (चांगले) हातचलाखीचे प्रयोग आणि ढेरसारी बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड ऐकून घ्यावी लागली. असो.
एवढे सर्व होई पर्यंत २ वाजत आलेच होते. त्यामुळे भरलेले पैसे वस्स्स्सूल करण्याच्या विचाराने मुख्य कार्यक्रमाकडे वळलो. भोजन.
आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं.
जेवणानंतर यमी, अभीर, स्वाती इत्यादींनी रजा घेतली. आणि विजूभाऊंनी बासरी काढली. त्या वनात, थंड वातावरणात विजूभाऊंनी बासरी वादनाचा एक तुकडा पेश केला.
बासरीवादनानंतर डॉक्टर दाढेंच्या चेहर्यावरील प्रसन्न हास्य म्हणजे बासरीवादन सुश्राव्य होते ह्याची पावतीच.
सखाराम गटणे आणि कोण बरे? ओळख करून घ्यायची राहूनच गेली.
ढँण्टडँण.. ओळखा पाहू?..... नाही न ओळखलेत?.....प्रकाश घाटपांडे.
विजूभाऊ.. बासरी वादनाचा कार्यक्रम छान झाल्याचे लगेच 'घरी' कळवून टाकले. पाहा..पाहा... चेहर्यावरचे ते प्रसन्न हास्य पहा...
'हे काय चाललय काय मिपावर? पुणेकर - मुंबईकर - नागपुरकर? असच चालणार असेल तर कशाला यायचं मिपावर?'
डॉ. दाढे. ह्याला म्हणतात मुत्सदीपणा. वादावादीत भाग नाही घ्यायचा. दूर उभं राहून मंद हास्य फेकायचे.
स्वराज्याचा उपभोग घेताना 'छत्रपती'.
इनोबा आणि छोटा डॉन ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्यावर आहे.
'धमाल्या, अरे! संयोजन केले म्हणून इतके हसायचे?
बागेत 'बस स्टॉप' नाहीए.
आमचा फोटो कधीच चांगला येत नाही, इति सौ. धमाल्या आणि सौ. पेठकर.
कथाकथनकार विजूभाऊ.
मंत्रमुग्ध श्रोते.
राऽऽम, कृष्ण, हरी..... कुंभारकला लाईव्ह.
चिखलात बरबटलेल्या बोटांची कलाकुसर्..वाह क्या बात है|
दीपमाळ इन मेकींग. ह्या सदगृहस्थांनी आम्ही स्वखुशीने देऊ केलेले १०० रुपयाचे बक्षिस नाकारले. कुठल्याही प्रकारचे बक्षिस घेत नाही. हॅट्स ऑफ टू हिम....
एकूण 'अभिरूची कट्टा' हसत-खेळत, विविध कलांचा आस्वाद घेत, निसर्गच्या सानिध्यात, उल्हासित वृत्तीत पार पडला.
धन्यवाद.
बासरीवादनानंतर डॉक्टर दाढेंच्या चेहर्यावरील प्रसन्न हास्य म्हणजे बासरीवादन सुश्राव्य होते ह्याची पावतीच.
सखाराम गटणे आणि कोण बरे? ओळख करून घ्यायची राहूनच गेली.
ढँण्टडँण.. ओळखा पाहू?..... नाही न ओळखलेत?.....प्रकाश घाटपांडे.
विजूभाऊ.. बासरी वादनाचा कार्यक्रम छान झाल्याचे लगेच 'घरी' कळवून टाकले. पाहा..पाहा... चेहर्यावरचे ते प्रसन्न हास्य पहा...
'हे काय चाललय काय मिपावर? पुणेकर - मुंबईकर - नागपुरकर? असच चालणार असेल तर कशाला यायचं मिपावर?'
डॉ. दाढे. ह्याला म्हणतात मुत्सदीपणा. वादावादीत भाग नाही घ्यायचा. दूर उभं राहून मंद हास्य फेकायचे.
स्वराज्याचा उपभोग घेताना 'छत्रपती'.
इनोबा आणि छोटा डॉन ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्यावर आहे.
'धमाल्या, अरे! संयोजन केले म्हणून इतके हसायचे?
बागेत 'बस स्टॉप' नाहीए.
आमचा फोटो कधीच चांगला येत नाही, इति सौ. धमाल्या आणि सौ. पेठकर.
कथाकथनकार विजूभाऊ.
मंत्रमुग्ध श्रोते.
राऽऽम, कृष्ण, हरी..... कुंभारकला लाईव्ह.
चिखलात बरबटलेल्या बोटांची कलाकुसर्..वाह क्या बात है|
दीपमाळ इन मेकींग. ह्या सदगृहस्थांनी आम्ही स्वखुशीने देऊ केलेले १०० रुपयाचे बक्षिस नाकारले. कुठल्याही प्रकारचे बक्षिस घेत नाही. हॅट्स ऑफ टू हिम....
एकूण 'अभिरूची कट्टा' हसत-खेळत, विविध कलांचा आस्वाद घेत, निसर्गच्या सानिध्यात, उल्हासित वृत्तीत पार पडला.
धन्यवाद.
वाचन
20191
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
वा पेठकर काका..
मिपा कट्टा.
उत्तम........... आनंद आहे ...
चांगले
ओळखीओळखीचे
In reply to ओळखीओळखीचे by एकलव्य
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त !!!
पेठकरकाका,
सहीच!
दूरुस्ती
झकास व्रुतांत!
In reply to झकास व्रुतांत! by ऋषिकेश
+१
In reply to +१ by सहज
खो खो !!
In reply to +१ by सहज
हा हा हा हा
मस्त.
सचित्र
मस्त फोटू
In reply to मस्त फोटू by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
:)
In reply to :) by ऋषिकेश
>>>धम्या
In reply to >>>धम्या by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
बाकी
बहोत अच्छे !
अरे वा !
कट्टा..
माझाही अनुभव....
In reply to माझाही अनुभव.... by मनिष
अवांतर,
छान
In reply to छान by लिखाळ
+१
पुढचा कट्टा स॑गीत स्पेशल
घाऊक धन्यवाद....
जबराट कट्टा!
In reply to जबराट कट्टा! by चतुरंग
शेवेची...
In reply to शेवेची... by प्रभाकर पेठकर
शेवेची भाजी! येस, समझ गये!
In reply to शेवेची भाजी! येस, समझ गये! by चतुरंग
मऊ शेव..
चांगली मजा
In reply to चांगली मजा by अनिल हटेला
माल मसाला असेन
मुंबईत कट्टा कधी ?
'दो हंसोका जोडा '
पेठकर काका
In reply to पेठकर काका by मिंटी
नो प्रॉब्लेम..
वरातीमागुन घोडे
मी पण फोटो
In reply to मी पण फोटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
In reply to मी पण फोटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे: छे:...
In reply to छे: छे:... by प्रभाकर पेठकर
ऋचाचे फोटो
In reply to ऋचाचे फोटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा: हा: हा:
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
हाहाहा ...
In reply to हाहाहा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म्म्म्म!
In reply to हाहाहा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय सांगतेस काय?
In reply to काय सांगतेस काय? by धमाल मुलगा
:)
In reply to :) by विसोबा खेचर
लोकहो,
यमी आजीच
In reply to यमी आजीच by अनिल हटेला
स्वातीच्य
कट्टा छान
झकास
कट्ट्याला
In reply to कट्ट्याला by धमाल मुलगा
आता पुढचा
In reply to कट्ट्याला by धमाल मुलगा
मी
तात्या
वा.
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
उशीर होणारच काका ....
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
धम्या नांव
पेठकर काका
जुने फोटो
पुढच्या 'मिपा' कट्टा स्नेहसंमेलनाबद्दल जरा आधीपासून कळवावे
मिपाकरांचे स्नेह सम्मेलन असे
In reply to मिपाकरांचे स्नेह सम्मेलन असे by विजुभाऊ
हे असं पण होते बरं का.
पण आत्ता ते फोटो का बरे दिसत
In reply to पण आत्ता ते फोटो का बरे दिसत by प्रमोद देर्देकर
तुम्ही आलात २ महिन्या पुर्वी.