Skip to main content

मौजमजा

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

अजुन एक..मासॉपें चित्र

लेखक स्वप्निल.. यांनी गुरुवार, 10/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
हे अजुन एक मासॉपें चित्र..१५ मिनिटांत काढलेय..पहिल्या चित्राएवढे चांगले नाही..पन वेगळा प्रयत्न आहे.. सांगा कसे वाटते ते.. स्वप्निल..

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 08/07/2008 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.

लहान मुलांचे उपद्व्याप

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 04/07/2008 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले करमणूक तर करतातच, पण कधीकधी भयंकर उपद्व्याप करून सळो की पळो करून सोडतात. माझा भाचा आहे. तो घरात कोणी नसताना ब्लेडने बाहुलीचं नाक कापत होता. नाकावरून ब्लेड सटकून त्याच्या तळहाताला कापलं आणि रक्त यायला लागलं. मग त्याची आई रागवेल म्हणून त्यानी जखमेत फेविकॉल भरला. मग दुसर्‍या दिवशी पस होउन ठणकायला लागल्यावर बोंबलला आणि त्याच्या आईला सगळा प्रकार कळला!

एक चित्र..मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये..

लेखक स्वप्निल.. यांनी शुक्रवार, 04/07/2008 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रे काढण्याची खुप हौस..पण आळशी आणि वेळ..एकदा सहजच मायक्रोसॉफ्ट पेंट वर खालील चित्र काढले.. कागदावर काढायचे म्हणजे बराच वेळ पाहीजे..नेहमी डोळ्यांसमोर संगणक..त्यामुळे हा रीकामा उद्योग.. :) सांगा कसे आले ते?? स्वप्निल..

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 30/06/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?" कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण. "नेमिची येई मग पावसाळा" हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार. मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच. "घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं. "इलो रे!

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

लेखक धमाल बाळ यांनी शुक्रवार, 27/06/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वार्ताहाराकडुन दिनांक २२ जुन स्थळ : भांबुर्डा २२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही. याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली.

हास्यतुकडे-२

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 26/06/2008 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता. ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.) बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या? ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?) बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला. ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?) बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली. ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?) बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली.