Skip to main content

मौजमजा

अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

लेखक Nile यांनी गुरुवार, 29/10/2009 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो. निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त. भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं. पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा. मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही. (क्रमशः)

तांदूळगड - तांदूळवाडी

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्‍याला दोरखंडाचे सहाय्य लागेल. काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा. डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता.

निवडणुका आणि मानोसपचार तज्ज्ञ ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 26/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात.

एक मुका प्रेमसंवाद!

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 26/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी! मिपावरील स्माईलीज माझ्या कायम फेवरिट राहिल्या आहेत. त्यांचाच वापर करून केलाय हा उद्योग! जमलंय का, बघा...

मात्र रात्रीची गोष्ट भाग ७

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ६ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. ( दिवाळी नंतर पहिल्यांदाच बसलो , खाजवणं चालू आहे डोकं... अशी अवस्था... !) मी - या. कशी झाली दिवाळी रं तुझी ? तो - लै भारी रं... मी - तुझ्यं थोबाड काय तरी येगळंच सांगत हाय ? काय झालं ? तो - नाय रं... दिवाळी... ते काय म्हणत्यात्...सरपराईझ .. सरप्राईज गिफ्ट नाय दिलं घरात म्हणून येन दिवाळीतच एकादाशी घडवली तीनं. मी - हा हा हा. तो - हसतो काय लेका.. तुझं लग्न होऊ दे मग आम्ही हसू... रावणासारखं !

संघटनापालट

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 23/10/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राजच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पण दिवसभर शुभेच्छांचे फोन, प्रत्यक्ष भेटी, पत्रकार परिषद यामुळे तो थोडा थकलेला होताच. रात्री साडेसातच्या सुमारास त्याने आपल्या सचिवाला बोलावले. "हे बघ, आता मला कोणाचे फोन देऊ नकोस. मी कुणालाही भेटणार नाहीये. आराम करतो जरासा. कळलं का?'' राजसाहेबांचा आदेश घेऊन सचिव मान डोलावून निघून गेला... राज दिवाणखाण्यात आला. त्यानं सोफ्यावर अंग टाकून दिलं. समोर वडील आणि काका यांचे फोटो होतेच. ते दोन्ही फोटो न्याहाळताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. "बाबा असते तर, त्यांना आज किती आनंद झाला असता.'' राज स्वत:शीच पुटपुटला.

आठवण हंसाची...

लेखक वेदश्री यांनी शुक्रवार, 23/10/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते!) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध! टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो!) धडधड वाढली होती...

दुरितांचे तिमीर जावो

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 21/10/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल आमच्या कडे वीज गेली (वीज म्हणजे याना गुप्ता नव्हे) . गेली म्हणजे काय जायचीच होती. आलेली वीज जायचीच. ते लोड शेडींग का काय ते म्हणतात ना त्याचाच परिणाम. वेळ दिवेलागणीची होती हे मूद्दाम सांगायला नको. वीज गेल्यावर नेहेमी सारखाच पोरांचा गोंगाट , तरुणांचा चित्कार असे ध्वनी निघाले. घातलेले फाटके बनीयन काढून मी नेहेमी सारखा चाळीच्या पॅसेज मध्ये जाऊन उभा राहीलो. " अहो निदान अंगात कपडे घाला" आमची सौ " अग अंधारात कोण बघतय मला ? " " तुम्हाला काही समजच नाही. आत्ता लगेच दिवे आले तर ? " " अग आत्ताशी कुठे गेले आहेत. येतील सावकाशीने.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.