श्रावण मोडकांची
मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;)
प्र-भाव, तर्र, बोळा
देशी, विदेशी, वारुणी!
बालांच्या कल्लोळात,
इंद्रियांच्या अविष्कारातही
उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही
तराठलेल्या डोळ्यांत,
जडावलेल्या पापण्यांतही
विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही
सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,
सकाळी दुपारी,
संध्याकाळी रात्रीही
भरलेल्या मद्यालयात,
आभास अन् अस्तित्त्वाचा
आसक्त मुक्तिपावक
टुल्लतराठ बेवडा