Skip to main content

(ती अन तो )

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 16/02/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ व दुवा ३ ती - इ..इ....नको ना. तो - नको काय नको ती - धसमुसळा कुठचा! तो - मी धसमुसळा तर तू कोण? ती - तिकडे शिरला बघ!! तो - आता काय करू? ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की. तो - तेच तर करतोय. ती - हो पण तुला तेच जमत नाही. तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू. ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का?

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 15/02/2010 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ आय टी मध्ये आल्यापासून खूप "जार्गन" ऐकायची सवय झालीये बघा. एकतर आपण स्वस्तात कामं करून देणारे नव्या जमान्याचे "बाबू" आहोत हे मान्य नसणारी (अथवा मान्य करायची इच्छा नसणारी) लोकं रात्रंदिवस शब्दकोष घेऊन आपल्या फुटकळ आत्मसन्मानाला गोंजारण्यासाठी असे जड-जड शब्द शोधून काढतात. प्रोजेक्टवर राबणारा इसम "रिसोर्स" असतो....

शेवटी आम्ही चंडोलच ..

लेखक चंडोल यांनी रविवार, 14/02/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावरील वेगवेगळ्या संस्थळांवर हिंडताना आम्ही अनेक बरे वाईट लेख वाचले आणि विचार केला आपणही काही मोजक्या स्थळांचे सभासदत्व घेऊन थोडे लिहून पाहावे. पण हे सभासदत्व घेताना सर्वात महत्वाचा प्रश्न होता माझ्या खात्याला द्यायच्या नावाचा, पुन्हा एकदा आमची जालवारी सुरु झाली, काहींनी आपल्या नावाला अनुसरून नाव दिली होती काहींनी स्वभावाला, पण स्वतःला नावं ठेवायचे जास्त प्रसंग मी माझ्यावर येऊ दिले नसल्यामुळे मला काही नाव सुचेना.

विकेट!!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 10/02/2010 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुचिताईंचा हा गंमतीशीर धागा वाचला आणि तुम्हासर्वांप्रमाणेच मीही माझ्या राशीबद्दलची निरीक्षणे पाहिली. यावरून विचारांची गाडी तडक आमच्या ऐतिहासिक प्रेमकहाणी कडे वळली! (प्रत्येकालाच आपली/आपल्या प्रेमकहाणी/प्रेमकहाण्या ऐतिहासिक वाटते/ वाटतात राव! ;) एखादा प्रेमवीरांचा चित्रपट पाहताना प्रत्येकजण त्यात स्वतःची प्रेमकहाणी बघतच असतो! ) अर्थातच आम्हाला आम्ही साजरा केलेला ऐतिहासिक व्हॅलेंटाईन डे, ज्या दिवशी (नि)धडधडत्या छातीने, थरथर कापणार्‍या हातात गुलाब घेऊन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीला 'इलू' चा अर्थ समजावला होता, तो दिवस आठवला.

०१०२२०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 01/02/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ फेब्रुवारी २०१०. म्हणजेच ०१०२२०१० ... उलट सुलट कशीही वाचा तारिख तीच. आहे ना जादू? :) जाताजाता: इंग्रजी भाषेत असे दोन्ही बाजूंनी सारखेच असणार्‍या शब्दसमूहांना पॅलिन्ड्रोम म्हणतात. काही उदाहरणं... nitin malayalam Able was I 'ere I saw Elba - Napoleon Dammit, I'm mad चीमा काय कामाची अजून काही आहेत का माहिती?

जालिंदर बाबा : पत्रकार समिक्षक ?

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर बाबा... संचार नावाची विचित्रपट समिक्षणाची मालिका मिपावर पूर्वी वाचत असे... चांगले चित्रपट शोधून शोधून त्यांना (घासुनपुसुन गुळगुळित ) मोहक बनवण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...

बर्फशिल्प

लेखक मस्तानी यांनी रविवार, 24/01/2010 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ...

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/01/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन व लेखकाचे बाह्यरुप हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात. असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे?