गाढवदादा गाढवदादा -
गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ? |१|
मासेभाऊ मासेभाऊ -
नापास झाला का हो ?
रडून रडून सगळा
टँक भरला की हो ! |२|
पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो
एकदा तरी वळून बघाव ? |३|
कासवपंत कासवपंत -
लढायला किती हळू जाता ?
ढाल पाठीवरती घेता
तलवार कुठे विसरता ? |४|
भोलानाथ भोलानाथ -
गुब्बू गुब्बू गुब्बू
पैशाचं मी पेरलं झाड
पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|
काव्यरस
मिसळपाव
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला.
डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं.