Skip to main content

मौजमजा

अगम्य

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 09/04/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो. ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो.

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 06/04/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही. मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले.. त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा... ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ... दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
. . . .II श्री अष्टविनायक प्रसन्न II आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, . ...

एक त्रागा सुनेचा

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/04/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : एक धागा सुखाचा -) एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे ! तू असशी जरी कर्ता तगडा , सासू सुनेचा बघशी झगडा - सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे ! उचलबांगडी बालपणाची , धुळीत स्वप्ने तारुण्याची - जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे ! सासू सुनातें बघतो कोणी , एक सारखी बसती फुगोनी - कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
काव्यरस

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

थोडेसे शब्दवणे

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 04/04/2011 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. नाजूकश्या पानाने फांदीच्या सालीला फाडून बाहेर येणे हे आश्चर्य. पातळ नाजूक पाने ! वार्यावर डुलून नवजीवनाची द्वाही देणारी. रंग तरी कसा तर शब्द बापुडे. निसर्गाशी असलेली आपली नाळ तुटली असे वाटून आत पोटात कुरतडते. अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा. आपले शब्द जसे तसेच झाडाला आलेली नवी पालवी. जीवन सातत्या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठीचे सर्व प्रयत्न. पण जीवन या सर्वांहून फार मोठे व्यापक.