मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संथ पाडते गझला बाई ....

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....) संथ पाडते गझला बाई - गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते .... कधी न कामें करी लौकर ती , कूर्मगतीने सदा करी ती ; बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते .... कुणी पुरे ना म्हणती गझला , कुणी वर्णिती उच्च गेयता ; मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते .... सतत चालते काव्य-टंकणी , होई न व्यनितुनी बाई शहाणी ; वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....

वाचने 1638 वाचनखूण प्रतिक्रिया 1

पप्पु अंकल 24/06/2011 - 11:21
तुमच्या आधिच्या कवितांप्रमाणे सुंदर विडंबन काव्य प्रकारात तुम्ही दगड आहात........................मैलाचा. शाब्बास...............लगे रहो.