मुलीस पत्र
प्रिय रिया,
हा हा म्हणता केवढी मोठी झालीस बाळा, तुला पंख फुटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं उद्या नोकरीनिमित्ताने दुसर्या देशात भुर्र उडून जाणार आहे. अशा वेळी तुझ्या या वेड्या आईचं मन सैरभैर होणं साहजिकच आहे. तुला मी देता येतील तितके चांगले संस्कार दिले, बाळकडू पाजलं, वेळोवेळी उपदेशाचे डोस दिले मग तुला आवडो अथवा न आवडो. पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या.
मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते.
मिसळपाव