मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

सुतक

स्वतन्त्र ·
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

पुण्यात काम करणाऱ्या "खेळघर " या संस्थेविषयी….

काव्यान्जलि ·
लेखनविषय:
प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे. आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत. मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही.

किशोर कुमारची गाणी

पुण्याचे वटवाघूळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स, खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच.

सुरक्षित खिडकी

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा" ......................................... ़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अ‍ॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु".

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

शशिकांत ओक ·
लेखनप्रकार

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok* Shock भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले.

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

बॅटमॅन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्‍याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे.

विसंगती - सुसंगती

आतिवास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच. मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?

प्रमोद देर्देकर ·
लेखनविषय:
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो. त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले.