नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग.
....
ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो.