मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

टर्मीनेटर ·

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.

रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो. आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.

जीवनातील "Q/क्यू"

भालचंद्र लिमये ·
जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा 'क्यू' काही संपत नाही. एकांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. ओळीत ठेवलेले अनेकांचे मृतदेह पाहून 'क्यू' ची कल्पना सुचली. जन्म होण्यासाठी कारणीभूत असलेली गुणसूत्रे मोठ्या प्रमाणात एकमेकांशी स्पर्धा करत मिलनासाठी येतात. योग्य मिलन झाल्यावरच जन्म होतो. इथपासून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 'क्यू' काही सुटलेला नाही.

अमेरिका-६ रस्ते आणि गाड्या

निमी ·
*रस्ते आणि गाड्या* दूरदर्शन मुंबईनंतर अन्य महाराष्ट्रात सुरू झालं तेव्हा बातम्या ऐकण्यासोबत बातम्या देणारे-देणाऱ्या दिसू लागल्या. त्याच काळात बातम्यांना हिंदीत समाचार आणि इंग्लिश मध्ये न्यूज म्हणतात हे कळलं. काही दिवसांनी माझ्या बाबांनी विचारलं,' NEWS शब्द कसा तयार झाला माहितीये का?' माझ्या चेहऱ्यावरचे सपशेल शरणागतीचे भाव समजून म्हणाले, 'चारही दिशांची आद्याक्षरे घेऊन म्हणजे North चे N, East चे E, West चे W, South चे S घेऊन NEWS शब्द तयार झालाय. दहावीपर्यंत भूगोलात 'गोल' मिळाला नसला तरी भारतीय आणि वैश्विक भौगोलिक ज्ञान आजतागायत अगाध राखण्याची किमया मला साधली आहे.

अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia

निमी ·
21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात.

अमेरिका ४ - डस्टबिन

निमी ·
पूर्वी प्रत्येक घरी एक सायकल असणं हे सामान्य, दुचाकी असणं हे भारी आणि चारचाकी असणं हे श्रीमंतीच लक्षण होतं. आता घरटी एक चारचाकी, माणशी एक दुचाकी आणि घरातल्या लोकांच्या निम्म्यान सायकली असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे भारतात एक-दोन कचऱ्याचे डबे असतात, अर्थात डस्टबिन असतात ! इथे अमेरिकेत मात्र माणशी अंदाजे चार डस्टबीन असतात. किचनजवळ विघटक आणि अविघटक अर्थात डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल गोष्टींसाठी मोठी मोठी डस्टबिन असतात. आपला गुडघा ते कंबर या उंचीची डस्टबिन घरात पाहून वस्तू खातात की फेकतात अशी शंका येते.

पाहिले म्यां डोळा..

आजी ·
मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. " "मरणात खरोखर जग जगते." कुणीतरी मरतं त्याचवेळी कुणीतरी जन्म घेतं.

अमेरिका ३ - पर्याय सापळा..

निमी ·
एक दिवस इथल्या मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो...एकतर अवाढव्य मॉल असतात. खरेदीच्या आनंदापेक्षा 'हरवू आपण' ही भीतीच वाटते. 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टी असल्याने ते थोडं आपल्या सरावाचं वाटतं. भारतात पण डी मार्ट सारख्या ठिकाणी भाज्या, फळं, दूध इत्यादी विभाग आपण पाहिलेला असतो. त्यामुळे थोडसं 'घरेलू' फिलिंग येत. अशीच काहीशी खरेदी करायला आम्ही गेलो. डॉलर्स गुणिले ८० हा मनातील कॅल्क्युलेटर 'सायलेंट मोड'ला टाकला कारण खरंच इथे 'लेकीच्या बापाचं' काही जाणार नव्हतं ! तरीही इथे वस्तू सापळ्याचे दर्शन घडलेच. इथे सॅन्टा क्लॅराजवळ 'आपना बजार' नावाचा एक बजार आहे.

अमेरिका २- बावळट आम्ही..!!

निमी ·
'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात.

अमेरिका १- उडतं वडाप

निमी ·
नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग. .... ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो.