संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव
मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे.
मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला.
मिसळपाव
फेब्रुवारी २०१३ मधील पंधरा सोळा तारिख असेल. रात्रीचे सात साडेसात झालेले. दुसऱ्या दिवशी विकली ऑफ असल्याने आज कुठल्याही परिस्थितीत साडेनऊपर्यंत कार्यालयाच्या बाहेर पडायचेच असे ठरवून संगणकासमोर नेहमीप्रमाणे तबला बडवणे सुरु झाले. (पत्रकारितेत की बोर्डला तबला म्हणतो आम्ही पत्रकार). हातावर बऱ्याच बातम्या असल्याने आज तरी ब्युरो चिफने ऐनवेळी नवी असाईनमेन्ट देऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत होते.