खिलजीचा माफीनामा
खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ...
जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ... चितेवर पहुडली असताना , नातेवाईक तिच्या अंगावरचे दागिने काढत होते तेव्हा विरक्तीची पुसट कल्पना माझ्या मनाला शिवू लागली होती . ह्या मोहपाशात अडकून पडण्यापेक्षा , जे जे आधी घडलेले आहे , कुणी दुखावले गेले असेल कळत नकळत , त्यांची माफी मागणे क्रमप्राप्त आहे. म्हणून मी माझी पूर्वीची ओळख लपवून , या मंडळात पुन्हा प्रवेश केला .
शक्य झाल्यास मला माफ करा ..
आपला नम्र
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
याद्या
4529
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
माफी नको.
RIP _/|\_
ओळख लपविल्यावर माफ कसे करणार
ओळख लपवलेली नाही आहे त्यांनी.
In reply to ओळख लपविल्यावर माफ कसे करणार by मराठी कथालेखक
अहो पुर्वीची ओळख लपवली आहे ना
In reply to ओळख लपवलेली नाही आहे त्यांनी. by shashu
वाईट वाटले
+१
In reply to वाईट वाटले by पैसा
तुमच्या आईच्या आत्म्यास शांती
+ १
In reply to तुमच्या आईच्या आत्म्यास शांती by डॉ सुहास म्हात्रे
माफी नको.
तुमच्याबध्दल खरचं वाईट वाटते
In reply to माफी नको. by दुर्गविहारी
दु:खद घटनेबद्दल खेद आहे.
+ १
In reply to दु:खद घटनेबद्दल खेद आहे. by सस्नेह
+१११
In reply to + १ by मुक्त विहारि
मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ
मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ
..