Skip to main content

कविता

तगमग

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 16/05/2008 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यासाठी इतकी दगदग श्वास घेतला, जाणवली धग होकाराचे आढेवेढे! आधी किंवा आत्ता वा मग फुकट भाषणे, उधार वक्ते विकत घेतले श्रोत्यांचे नग इथे किती गजर्‍याची बोली? इथे कशी पदराची लगबग? सुचले नाही काही क्षणभर नुसती तगमग तगमग तगमग
Taxonomy upgrade extras

(जीवघेणे!)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/05/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या चे 'जीवघेणे' बोल वाचून आमच्या काही दुखर्‍या आठवणी जाग्या झाल्या. ;) चालणे की ते मटकणे! जीवघेणे वेधती का नेत्र, सजणे!

वाघाची मावशी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/05/2008 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाल कविता वाघाची मावशी वाघाची मावशी, ए मनी मावशी वाघाला आण ना घरी एके दिवशी तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! मग कुठे? लांबलांबच्या तिथे तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात! जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती? छे रे बाळा! आता मी थकले आहे किती? उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत? तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी? म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी शर्थ झाली बाई!
Taxonomy upgrade extras

कवितेचा एक प्रयोग

लेखक रामदास यांनी बुधवार, 14/05/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्जनशीलता वाढावी म्हणून काही प्रयोग शिकण्यासाठी दोन दिवस गेलो होतो. रँडम वर्ड- सहा शब्द -घेउन , त्यांचा ओळीच्या सुरुवातीस उपयोग करायचा आणि कविता लिहायची असा एक प्रयोग होता. माझ्या वाट्याला आलेले शब्द असे होते.श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे. तीन शब्द वापरून मी तीन ओळी लिहिल्या. उरलेल्या शब्दांचा उपयोग राहून गेला. कविंनो बघा काही जमतंय का. श्रावण , सरण्यापूवी, एकदा भिजून घेतो. उन, तापण्यापूर्वी, मोगरा फुलून घेतो
Taxonomy upgrade extras

अबोला

लेखक शितल यांनी बुधवार, 14/05/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
अबोला का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली !! अबोला तुझा हा मज वेड लावी शब्दच माझे मी आठवुन पाही !! कळेना ना मला तु काय अर्थ लावी शब्द हे माझे हळवे किती !! रोखुनीया डोळे पाही जरी तु मज कडे कळेना मला अबोला तुझा हा फसवा किती !! अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !!

नाते ना 'ते' राहीले

लेखक भ्रमर यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.
Taxonomy upgrade extras

मी गेल्यावर

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 09/05/2008 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री अचानक झोप उडाली होती प्रखर झोतात खोली होते काय नाही समजले शुभ्र किरणांनी घट्ट बांधले सरसर नेले वरती ओढून दिले एका कक्षात टाकून बघतो अघटीत काय जाहले सभोवती बहु लोकची दिसले धावलो बाजुला माणूस पाहुन विचारण्या कोठे आलो आपण नव्ह्ती भींत तरी अडकलो त्याच्यापाशी नाही पोहोचलो विचारले ओरडून मी त्याला कसला आहे विचीत्र मामला बहुदा त्याने नाही एकले म्हणून मी निरखूनी पाहिले खुर्चीवरती होता बसला प्रकाश रज्जुने बांधला हात दोन्ही उंचावलेले दंडामधुनी रक्त खेचले घाबरून मी पाही सगळे चारी दिशा मानव पसरले कोणी धावत्या पट्ट्यावरती कोणी होते उलट लटकती बाब अचानक कळली सारी प्रयोगशाळा होती न्यारी जाणण्या सं
Taxonomy upgrade extras

आधुनिक कृष्ण

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 08/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे मातेची ममता अन् बापाचा धाक पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक दिवसा यशोदा अन् रात्री देवकी वसुदेव की नंद सगळाच आनंद रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष
Taxonomy upgrade extras

समर्पित हो

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 05/05/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या वाटेकडे डोळे लावुन बसू नकोस आजच्या कुवतीचा अभिमानी होऊ नकोस. स्वप्रतापे स्वबळे तू अवघेचि जिंकुन घे जिंकण्यासाठी जिंकण्याची अभिलाषाही जिंकुन घे. प्रकांड हो प्रबुद्ध हो चंड हो प्रचंड हो प्रकर्षाने प्रारब्धावर तुच तू प्रसन्न हो. प्रकाशाचा पुंज हो तेजाची मुर्त हो भोवतीच्या तमसावर ज्योतिर्मयी शर हो. स्वतंत्र हो समृद्ध हो समर्थ हो सनाथ हो अंगीकृत कार्याला सर्वस्वी समर्पित हो.
(सदासर्वदा) तो मी नव्हेच
Taxonomy upgrade extras