मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळाची गरज

हर्षद आनंदी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी; अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी. एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी; माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी. एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी; पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी; आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी. एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी; मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी

वाचने 4495 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 11:38
हर्षद, ही कविता तुमचीच आहे का? कारण काही दिवसांपुर्वीच ही कविता मला ईमेल वर आली होती. http://sucheltas.blogspot.com

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 12:23
अहो हर्षदनी लिहीलेलं नाही तर केशवटुकारांनी लिहीलेलं विडंबन आहे :) http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 11:49
अहो कविता छान आहे !! आणी आता कविता म्हनुन न बघता कच्चा माल म्हणुनच बघत असतो मे पन !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सर्किट डांबिस गुरुवार, 08/14/2008 - 12:20
http://www.misalpav.com/node/1196 सरपंचांनी हे जे काही लिहून ठेवले आहे, त्याची जरा अंमलबजावणी होईल का ? - सर्किट

अरुण मनोहर गुरुवार, 08/14/2008 - 12:40
हा म्हणतो आहे एक प्रेयसी पाहिजे, पण खरतर इथे सात प्रेयसींचे मागणे केले आहे. मिळुदे बापुड्याला. (मिळाल्यावर पस्तावू नको!) कपया ;;) ह.घ्या.