मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...तोच आहे.

अंकुश चव्हाण · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
...तोच आहे. बासरीत सूर ओतले ज्याने, नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने, तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कालियाचे मर्दन केले ज्याने, कन्साचे ताड्न केले ज्याने , तुज वादळात सावरणारा गिरिधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने, द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने , तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कौरावांविरुद्ध पांचजन्य फुंकला ज्याने, अर्जुनास गीता सांगितली ज्याने, तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! ही कविताही जर माझ्याकडून पुनर्प्रकाशित झाली असेल तर क्रुपया मला तसे सांगा. प्रतिक्रियांचे (अर्थातच टिकांचेही ) स्वागत आहे. थोडेफार लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. अबोध आणि अजाण समजुन मार्गदर्शन कराल अशी अपेक्शा.

वाचने 1004 वाचनखूण प्रतिक्रिया 1