Skip to main content

एक दिवस............

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 06/01/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.

एक ग॑ध हलकासा
सारा दिवस दरवळला

एक उडती नजरानजर
सारा दिवस गुणगुणला

एक स्पर्श ओझरता
दिवस सगळा झिणझिणला

दिवस सरता सरता का
जीव असा हुरहुरला ?

लेखनविषय:

वाचने 2379
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली...
- असे लिहायचे होते.