अंधारात चालले, चार तरुण मित्र
रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं.
त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं
अंधारात चालले, तिन तरुण मित्र
चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर
एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर
दोनजण उरले, दोघेही घाबरले
"कोण आहे तिकडे?"
भेदरून ओरडले
अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र
उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र
काय होणार आता,त्याने लगेच ताडलं,
चावलं
फाडलं
अंधारात चालले, चार तरुण मित्र,
शोधत होते भक्ष,
आठ लाल नेत्र
--------------------
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3124
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!! भारी लिहिताय!!
आभारी आहे
शेवटचं कडवं,
सुरुवातीची "माणसं" आता स्वतः
In reply to शेवटचं कडवं, by जव्हेरगंज
जव्हेरभौ...
In reply to शेवटचं कडवं, by जव्हेरगंज
धन्यवाद मित्रा
In reply to जव्हेरभौ... by चांदणे संदीप
शेवटच्या कडव्याचा अर्थ असा की
In reply to शेवटचं कडवं, by जव्हेरगंज
And then there were none...
ह्हू हूहूहूहूहूहूहू!
अप्रतिम भिती