कोळीगीत: आई एकवीरा
आई एकवीरा हाय माजी पावन मोठी
तिच्या पुजेला आनली साडी चोली ||ध्रु||
आम्हा कोल्यांची देवी ही नवसाची
वाट अवघड गो हिच्या मंदीराची
डोंगरावर जाऊन माय बसली
तिच्या पुजेला आनली साडी चोली ||१||
हळद कुंकू निरांजनाने
ताट पुजेचे हे सजवीले
साडी चोली बांगड्या नथ कानातले
कंबरपट्टा जोडवी पैंजन पायातले
तिच्या पुजेची अशी तयारी केली
तिच्या पुजेला आनली साडी चोली ||२||
पायर्या हजार हजार तिच्या मंदीराला
चढून जावाचो जावाचो तिच्या दर्शनाला
बरो वाटतोय गो वाटतोय माझ्या मनाला
नवस फेडाया निघाले आशा मला भोळीला
तिच्या पुजेला आनली साडी चोली ||३||
वरील गीत चालीसह येथे ऐकता येईल.
- पाषाणभेद
२७/०९/२०२६
वाचने
14
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया