Skip to main content

कथा

दोसतार - १४

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 15/07/2018 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा दोसतार -१३ https://www.misalpav.com/node/42919 पुढच्या तास इनमादार सरांचा. ते आल्या आल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले. आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता. अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही इनमादार सर वर्गावर येवूच नयेत असे वाटत होते.

दोसतार - १४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/07/2018 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा दोसतार -१३ https://www.misalpav.com/node/42919
पुढच्या तास इनमादार सरांचा. ते आल्या आल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले. आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता. अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही
इनमादार सर वर्गावर येवूच नयेत असे वाटत होते.

चवथी कथा - नर्गिस नजर..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2018 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो कथा तिसरी - शहजादी

नर्गिस नजर

मिर्जा शाह रुख, बहादूर शाहच्या एका मुलाचे नाव होते.

वार्‍याची डरकाळी !

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी मंगळवार, 10/07/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजमध्ये असतानाची आठवण. आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता. आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं!

कथा तिसरी - शहज़ादी....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/07/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो

शहजादी

मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता.

झरोके

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 08/07/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला एक गुलाम विकत घ्यायचा आहे." टेबलावर हजाराचे पुडके ठेवत मी म्हणालो. हॅट एका बाजूला कलवली. आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. "कसला पायजे? काळा, गोरा, रानटी? की आपला साधाच?" मुंडी वर न उचलता तो मनुष्य पैसे मोजण्यात गर्क होता. "पुरुष की बाई?" या वेळी मात्र त्याने वर पाहिले. भिवया थोड्या ताणलेल्या. "तुमच्याकडचा अव्हेलेबल स्टॉक तरी दाखवा" बियरच्या बॉटलचं झाकण काढावं तसं मी विचारलं. "तसं दाखवता येत नाही इथं. माल बाहेरून मागवावा लागतो. बरीच लफडी आहेत. तुम्ही रिक्वायरमेंट कळवा" एव्हाना त्यानं चौथं बंडल मोजून संपवलं होतं. काय? तुम्ही त्यांच्याशी नडता. ज्यांना घ्यायची सवय आहे.

राजयोग - १५

लेखक रातराणी यांनी रविवार, 08/07/2018 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
रघुपतीने विचारलं, "काय चालू आहे हे?" नक्षत्रराय डोकं खाजवत म्हणाला, "नाच चालू होता." रघुपती तिरस्कारानं म्हणाला, "छि छि." नक्षत्रराय अपराध्यासारखा उभा राहिला. रघुपती म्हणाला, "उद्या इथून जायचंय. तयारीला लाग." नक्षत्रराय म्हणाला, "कुठे जायचंय?" रघुपती - "ते सगळं नंतर सांगेन. आता फक्त इथून जायचंय." नक्षत्रराय - "मी इथेच ठीक आहे." रघुपती - "ठीक आहे!? राजकुळात जन्म झालाय ना तुझा? तुझ्या सगळ्या पूर्वजांनी राज्य केलं आणि एक तू आहेस इथं या जंगलात कोल्ह्यांचा राजा झालायस! आणि म्हणे ठीक आहे!" रघुपतीच्या कठोर शब्दांनी आणि लालबुंद डोळ्यांनी सिद्ध केलं की नक्षत्रराय ठीक नाहीये.

दुसरी कथा "गुलबानो....."

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 07/07/2018 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...."

गुलबानो

....गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की.

कुलसूम ज़मानी बेगम...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/07/2018 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी Simple, Free Image and File Hosting at MediaFire आपण फाळणीच्‍या कथा मंटोच्‍या कथांमधून वाचल्या. मी त्या कथांचे भाषांतर येथे केले आहे. इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या, चांगल्या किंवा भीषण, त्‍याच्‍या पार्श्वभूमीवरील कथा या नेहमीच ह्रदयद्रावक असतात. उदा. पानिपतच्या पार्श्वभूमीवरील माझी ‘‘नथ’’ ही कथा.

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 04/07/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे १ वाजले होते, पित्ज्झा बॉयला अर्ध्या तासात ३ पित्ज्झे डिलिवर करायचे होते. उशीर झाला तर ग्राहक पैसे देणार नाही आणि मालिक पगार हि नाही. पित्ज्झा बॉयच्या नौकरीत वेळेचेच महत्व. बाईक स्टार्ट करून तो निघाला. तापलेल्या गरमागरम सीटचे चटके त्याला बसू लागले. आजीने सांगितलेली गोष्ट आठवली, "कोल्होबा-कोल्होबा बोरोली पिकली, नाही नाही आजीबाई ढुंगोली शेकली". मनात विचार आला गाव सोडून आपण या शहरात पैसे कमवायला आलो कि ढुंगोली शेकायला. चौरस्त्यावर पोहचतात समोर रेड लाईट दिसली. दिल्लीची रेड लाईट, च्यायला आता चक्क ५ मिनिटे थांबावे लागेल.