Skip to main content

कथा

मुक्त मी !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 23/08/2018 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वयाच्या साठाव्या वर्षी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि बॉम्बच पडला सगळ्या घरात !नवरा-बायको म्हणून पटत नव्हतंच कधी., ते सारे ओढून ताणून चाललंय हे तर जगजाहीर होते. पण एकदम घटस्फोट? इतकी वर्ष एकत्र काढल्यावर हा असा विचित्र निर्णय घेण्याचं कारण काय? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला. इतकी वर्ष जमवून घेतलं ना त्याच्याशी ? मग आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्याला एकमेकांची ,एका साथीदाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा आता हे असं वेगळं राहून काय मिळवणार आहेस तू ? आणि प्रमोद चा काही विचार करशील की नाही? नातवंडं, मुलं ,सुना ,नातेवाईक मंडळी, समाज, बापरे किती लोक? इतक्या सगळ्यांना समजवायचं ...

परग्रहावरील प्रेम रहस्यकथा भाग २

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 21/08/2018 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती ., क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले . अरे मयूर या माणसाजवळ थांबणे धोक्याचे आहे आपल्याला इथून निघून जाणेच योग्य ठरेल . असे बोलत ते निघाले ,.आपण पुढच्या वेळेस पूर्ण तयारीत या ग्रहावर येऊ खूप वेळ प्रवास केल्यावर ते एकदाचे आपल्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले .

गावाकडची गोष्ट

लेखक दिनु गवळी यांनी शनिवार, 18/08/2018 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची .

आभाळ

लेखक शब्दवेडी यांनी शनिवार, 18/08/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे. तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण! लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात.

भारांच्या जगात... ४

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 13/08/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

राजयोग - १६

लेखक रातराणी यांनी बुधवार, 08/08/2018 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी एकदाचे रघुपती आणि नक्षत्रराय राजमहलला पोचले. पराजित होऊन पळून आल्यावर शुजा नवीन सैन्याची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करीत होता, पण राजकोष रिकामा झाला होता. प्रजा कराच्या ओझ्याने त्रस्त होती. याच दरम्यान दाराचा पराजय आणि नंतर त्याची हत्या करून औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर बसला. ही बातमी शुजाला मिळताच तो अस्वस्थ झाला. पण सैन्याची तयारी झाली नव्हती, काहीतरी करून अजून वेळ काढता यावा म्हणून त्यानं एक दूत औरंगजेबाकडे पाठवला.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 06/08/2018 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - ७ वारी.. प्रेमाचे रिंगण.. ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले.. पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते..

काळी मांजर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 05/08/2018 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काळी मांजर

मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही.

दोसतार - १५

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 05/08/2018 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42996
आम्ही भूगोल आणि नागरीक शास्त्र एक करत समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी येताना लोकप्रतिनीधींची कामे वाचून हसू लागलो. मराठी आणि भौतीक शास्त्रातील न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम क्रीया आणि प्रतिक्रीया या नेहमीच समान परंतु एकमेकंच्या विरुद्ध दिशेने घडतात. तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. हे वाचत राहीलो. मधली सुट्टी संपून नव्या तासाचे सर वर्गावर आले तरीही आमचे वाचन चालूच राहीले.
पुस्तकं उपलब्ध नसणं याचा दोनतीन दिवसातच सगळ्यांना कंटाळा आला.