राजयोग - १४
काकासाहेबांच्या आनंदाला आज उधाण आलंय. दिल्लीश्वराचे राजपूत सैनिक आज विजयगढचे पाहुणे आहेत. बलशाली शाहशुजा विजयगढच्या किल्ल्यात बंदी आहे. कार्तवीर्यार्जुनानंतर असा बंदी मिळालाच नाही विजयगढला. त्याची अवस्था आठवून निश्वास सोडून काकासाहेब राजपूत सुचेतसिंहला म्हणाले, "बघा बरं, काय तयारी करावी लागली असेल शंभर हातांत बेड्या घालायला.. कलियुग आलं आणि सगळी धुमधाम बंद!
मिसळपाव