क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग २
"शांभवी पुढच्या महिन्यात आपल्या नवीन ऑफिस आणि प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला फ्रँकफर्ट ला निघायचं आहे तेव्हा इकडची सगळी कामं आटोपून घे आणि उरलेली कामं टीम ला विभागून दे." फोन वरून अथर्व शांभवीला सूचना देत होता.
"ठीक आहे अथर्व. नेहमीप्रमाणे मी प्रेसेंटेशन पण तयार करते." असं म्हणून शांभवीने फोन खाली ठेवला आणि ती आपल्या कामाला लागली.
अथर्व जॉईन झाल्यापासून एका वर्षातच ए बी एस ग्रुप ने बरीच मोठी मजल मारली होती.
मिसळपाव