Skip to main content

कथा

"आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 01/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो.

"मला तुझ्यावर भरवंसा आहे." चार जादूचे शब्द.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 30/05/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता.त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली.त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्‍याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्याला पाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं. "काय मला ओळखलं नाही?" असा त्याने पहिला प्रश्न केल्यावर परत माझी आठवण मला त्याच्या आवाजाची माझ्या मेमरीतली लोकेशन त्रास द्यायला लागली. मी थोडं शरमल्यासारखं करून गंमतीत म्हणालो, "age became" तो हंसला आणि म्हणाला, "अरे बाबा!

निशब्द - अंतिम भाग.

लेखक सँडी यांनी गुरुवार, 28/05/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुढे... ती: मी बाबांशी बोलु का? तो: नको. मी बोलेल योग्यवेळी. ती: ठीक. तो: आपल्या मित्रमैत्रीणींसाठी आपलं नातं वेगळचं आहे नाही? ती: हो! पण आजकाल सगळे संशयित नजरेने पहातात. तो: हं! चल तुला सोडतो बसस्टॉपला. ती: .... ----------------------------------------------------------------- (संध्याकाळी फोनवर) ती: हॅलो! काय करतोयसं? तो: काही नाही.

सरप्राईज

लेखक दिपक यांनी गुरुवार, 28/05/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
"चल ऊठ चार वाजले. ऊठतोयेस ना?" आईच्या आवाजाने झोपेला झटकुन ऊठुन बसलो घड्यळ्यात पाहिले तर चार वाजुन गेले होते. ज्यासाठी दादर स्टेशनला जायचे आहे तोच विचार मनात. आई मला उठवुन परत झोपली मीच सांगितले तसे. 6.30 ची गाडी आहे लवकर पोहचायला हवे हे मनातच बोलुन फटाफट आंघोळ वगैरे आटपुन तयार झालो.. घड्याळ्यात पावणेपाच. चहा बनवला दुध टाकायला गेलो तर दुध नासलेले. चहा तसाच बेसीन मध्ये ओतुन चहाची तहान पाण्यावर भागवुन बाहेर पडलो. बिल्डींगमधुन बाहेर पडलो तेव्हा दुध पोहचवणाऱ्या पोरांची धावपळ चालु होती. शेजारच्या बिल्डींगखाली पारिजातकाचे झाड आहे काही सेंकद तिथे घुटमळलो. प्राजक्तांचा सुंगध छातीत भरभरुन घेतला.

चानी (च्यानी नव्हे चानी चांगल्यातला चा )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 28/05/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्‍यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरून बोटं फिरवली.