Skip to main content

कथा

वास्तव

लेखक मराठे यांनी मंगळवार, 03/05/2011 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्यांदा राहुल आरशात डोकावला. गळ्यातली सोन्याची चेन आत टाकत, कोपर्‍यातल्या तंबोर्‍याकडे नजर टाकली. कधी नव्हे ते राहुलला आजच्या कार्यक्रमाआधी थोडी जास्त धाकधुक वाटत होती. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मुंबईतला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. काही तासांपुर्वीच थेटर हाऊसफुल्ल असल्याचं त्याला कळलं होतं. आणि जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील हुरहूर वाढतच होती. राहुल गाण्याचे मेळावे करायला लागल्या पासून त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. लोकांना त्याचं गाणं, त्याचा आवाज खूपच आवडत होता.. इतका की लोक त्याची तुलना संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांशी करायला लागले होते.

हर्षा!!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 27/04/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
बरी-वाईट कशीही का असेना माझी ही पहिली कथा तात्यांना अर्पण...:) "हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं. "सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जातो. हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. गोरा वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी.

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

अर्धवट राहीलेले प्रेम

लेखक वेदान्त रोहिदास सालियान यांनी बुधवार, 13/04/2011 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम सर्वच करतात पण जो व्यक्ति दुसरया व्यक्ति च्या भावना समजून घेतो तेच खर प्रेम. प्रेम म्हणजे दुसरयासाठी आपल्या भावना बंदिस्त करून ठेवणे. प्रेम करन सोपं असत पण तिच्यासाठी/ त्याच्यासाठी त्याग करन अवघड असत. तीच नाव विदया. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला तासात सुध्दा एकत्रच होतो. तेव्हा कधी तिच्या कड़े पाहिल्यावर वाटल नाही की कधी मी तिच्यावर प्रेम करेन पण म्हणतात ना की प्रेम आंधळं असत. दिसायला तशी ती attractive रंग सावला. उंचीने लहान पण खरच तिच्या सारखी कोणीच नाही.

ये आकारा.......

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 13/04/2011 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
“अनिता ए अनिता, अग बाल्कनीमध्ये काय करते आहेस एवढा वेळ? चल लवकर.” “आले, आले” “चल आता निघू या.तुला डॉक्टरकडे नेवून आणून मला ऑफिसला जायचय.” “अरे, आपल्या बिल्डिंगच्या मागे जी रिकामी जागा होती ना तिथे बहुधा बांधकाम सुरु होणार आहे असे वाटतंय “ “तरीच मागच्या महिन्यात एकदम तिथे काँग्रेस गवत काढून टाकणे चालू होते. तारेचे कुंपण घालत होते.” “काय म्हणतील रे डॉक्टर? आपल्याला हवी ती गोड बातमी देतील?” “देतील का काय? देणारच.” …… …… …… “हॅलो …. सासूबाई, मी अजय बोलतो आहे. एक चांगली बातमी सांगायची आहे. तुम्ही आजी होणार आहात.” “अरे वा! आनंदाची बातमी आहे कि ही. कशी आहे अनिता? कितवा महिना आहे?