Skip to main content

कथा

दहावीचा निकाल.

लेखक तर्री यांनी रविवार, 19/06/2011 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा निकाल नुकताच लागला होता. वर्तमान पत्रामध्ये गुणवान मुलां-मुलींचे सचित्र कौतुक सुरु होते. डॉ.अनिल आपल्या तासावर भाड्याने घेतलेल्या कन्सलटिंग रूम मध्ये पोहोचले. आज एक-दोनच अपॉईंटमेंत्स होत्या . सेविकेने वर्तमान पत्रे समोर ठेवली . वाचता वाचता डॉ़क्टर एकदम भूतकाळात गेले. बारा वर्षापूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस आठवून त्यांचे अंग शहारून आले. फर्स्ट एम.बी.बी.एस. ला असताना अनिल को़कणात आजोळी आला होता. आजोबा गेल्यापासून अनिलचे आजोळ आटले होते. तोही आता कॉलेज-कामात अडकत चालला होता. अनिल खूप हुशार होता. दहावीला तो बोर्डात येणार हे जणु सर्वानी गृहित धरले होते. पण झाले भलतेच.

एका कथेची गोष्टं ------- लघुकथा -------- जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी बुधवार, 15/06/2011 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
ते एका नवीन, एकदम ओरीजीनल कथेच्या शोधात होते. लेखकाने त्यांना एक नवीन कथा दाखवली. नाही हो मी ज्याच्या शोधात होतो ते हे नाही. तिकडे बघा कशा कथा लिहील्या जातात, एकसे एक! त्यांना म्हणतात ओरीजीनल! आपल्या कडल्या एकाही कथेला त्याची सर नाही. गेली कित्येक वर्षे वाट बघतोय अशी एखादी तरी कथा हाताळायला मिळावी म्हणून, पण आपल्या देशात कधी तशा कथा जन्माला येतील कुणास ठाउक? लेखकाने त्यांना दूसरी कथा दाखवली. नाही! थोड़ी चीनी कम वाटतेय. लेखकाने त्यांना तीसरी कथा दाखवली. नाही हो ह्यात मसाला नाही. पब्लिकला माल मसाला लागतोच हो. समजताय ना मी काय म्हणतो आहे ते?. लेखकाने त्यांना अजून एक कथा दाखवली. उं हूं!

अवलिया

लेखक निल्या१ यांनी सोमवार, 06/06/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या.