Skip to main content

कथा

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

बळी कान पिळी

लेखक हर्षद आनंदी यांनी रविवार, 10/07/2011 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई .. मायानगरी मुंबई.. हिची काय महती.. एक रात्र्रीत रंकाला राव आणि रावाला रंक बनविणारी ही जादू नगरी... ह्या नगरीत राहणारे लोकही असेच, हरहुन्नरी!! याच नगरीच्या कुठल्याश्या कोपर्यात घडलेली हि कथा.. कहाणी एक प्रेमाची! “काय आज कामावर नाही जायचं का?”, आईचा वरच्या पट्टीतला सूर ऐकून विशाल आळस झटकून एकदाचा उठला. उठला कि पहिला भटक्या, SMS कुणाकुणाचे .. ८:०४ च्या लोकल आधी स्टेशनवर भेट .. नाव: ती .. हो तीच, ती आठवली आणि झटकन एक हास्याची लकेर त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली. मात्र पाणी भरणाऱ्या आईच्या नजरेतून नाही सुटली. पुन्हा तिचा टेप चालू होताच, विशाल पळाला.. तसेही त्याला लोकल गाठायची होती..

क्षणभराची सौभाग्यकांक्षिणी ---- कथा--- जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी सोमवार, 04/07/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता. तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या.. तिच्या स्वता: बद्दलच्या संवेदना आता संपल्यातच जमा होत्या.

बदल ----लघुकथा ----जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले. या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले. अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले! विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले. फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले. कसला? ब्रम्हदेवांनी विचारले. काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारदमुनी म्हणाले. असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले. ह्या लोकशाही बद्दल सर्वत्र फार गोड गोड बोलल्या जाते आणि फार छान सुंदर सुंदर लिहिल्या जाते.