Skip to main content

कथा

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

जगायचं कसं?

लेखक विनीत संखे यांनी रविवार, 10/04/2011 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेंशनर ची डायरी.... आज मी आणि सौ मालाड येथे इनॉर्बिटला मॉलमध्ये गेलेलो. हा मॉल म्हणजे पन्नास वर्षांच्या मुंबईत गुजारलेल्या आपल्या आयुष्यात प्रथमच तिचे सिंगापूर (किंवा शांघाय) होण्याच्या स्वप्नात उचलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे मनोमन वाटले. (वास्तविक हे एवढे मोठे पहिले पाऊल उचलल्यावर, मुंबईचा पाय मुरगळून ती त्याच पाऊलावर बसकण मारणर होती हे निश्चित होतं... पण पाऊल उचलल्याशी मतलब ... काय? ) मॉल भारी होता. शनिवार संध्याकाळ असल्याने गजबजलेलाही होता.

प्लान! ... एक गूढकथा ...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 05/04/2011 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
"थेरडे! थेरडे सोड तिला. अगं दम काढशील तिचा. मरेल ती. सोड! सोड म्हणतेय ना मी.", हवालदारीण मंजुळाला पकडून खेचत होती. पण आज मंजुळा दोन पोलिसांना ऎकत नव्हती, एवढी तिच्या हाती ताकद आली होती. सवित्रीला जाऊ द्यायचेच नाही असे तिने ठरवलेले. आज शनिवारची नामी संधी मिळाली होती तिला. कपड्यावरचे डाग नीट धुतले गेले नाहीत म्हणून सकाळी सावित्री आली अन तिने मंजुळाशी वाद घातला. मंजुळानेच साऱ्याजणींचे कपडे धुतले होते. सावित्रिचे मात्र मळलेले होते. मग काय दोन रान मांजरी भिडल्या. आपल्या बापाचं ज्यांनी कधी ऎकलं नाही त्या एकमेकींचं काय ऎकून घेतील? झालं मग द्वंद्व.