Skip to main content

कथा

एलियन्स----लघुकथा----जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी मंगळवार, 31/05/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!! आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ता-याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी आढळून आली आहे . ह्या ग्रहा वर अनेक जीवजन्तूं सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विवीध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत.

आजोबांची काठी

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 06/05/2011 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे. खरे तर ती काठी आजोबांची गरज होती.

जवाहिरीचा खात्मा

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 06/05/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
लादेनचा खात्मा झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता कधी एकदा त्या नं. २ ला संपवतो असे झाले होते. त्यांनी लगेच सुरक्षा समितीची बैठक बोलावली. परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला.

ब्राऊ....१

लेखक गवि यांनी गुरुवार, 05/05/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
3