Skip to main content

कथा

उन्नत क्षण

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 09/03/2011 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो.

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १३ ते १६-शेवट)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १३) ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते- .....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्‍यांकडून, जवानाकडून! त्यामध्ये अनेक महिला होत्या. त्यापैकी जेनिफर नावाची एक अमेरीकन गुप्तहेर होती. ती पूर्वी एक अट्टल गुन्हेगार होती. पण अमेरीकेने तीला काही वर्षे तुरुंगात ती सुधारल्यानंतर रशियाच्या हेरगीरी साठी पाठवले होते. पण, ती युद्धा दरम्यान पकड्ली गेली.

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग ९ ते १२)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग ९) ......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती: रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो. पोटापाण्यासाठी या मोठ्या जहाजावर प्रवास करावा लागत असे. मी ही त्यापैकीच एक. पोटापाण्यासाठी जहाजावर काम करणारा एक टेलीकॉम इंजिनियर.

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १ ते ८)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
[माझी आतापर्यंत क्रमश: प्रसिद्ध झालेली कादंबरी "जलजीवा" ही आता येथे पुन्हा वाचकांच्या सोयीसाठी सर्व १६ भाग एकत्रीत करून देत आहे] सूचना: ही एक "काल्पनिक सत्यकथा" असून यातील पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचे जगातल्या इतर काही ठिकाणे, व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य आढळले तर त्याला योगायोग मानायचा की सत्य मानायचे हे मी वाचकांवर सोपवत आहे. (भाग-1) लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला.

दाबेली काका

लेखक गुड्डु यांनी शनिवार, 05/03/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझा एक अनुभव सांगणार आहे. ज्यामुळे मी माझी कोणालाही नावे ठेवण्याची सवय सोडली नाही पण खुप कमी केली. तर गोष्ट ८ वर्ष जुनी आहे.मी आणि माझी बहीण रोज संध्याकाळी फीरायला जायचो येताना ८.३०,८.४५ वाजता एक दाबेली च्या गाडीवर एक जुजबी ओळख असलेले काका दिसायचे. ३-३,४-४ दाबेल्या आपले खात असयचे. आता बघा ७५-८० वय असलेला माणुस असा जंक फूड खाताना बघुन काय विचार येणार?

वषाट

लेखक मुक्त यांनी शनिवार, 05/03/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला. कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं. परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.