Skip to main content

कथा

दर्शनेच्छा बलियसि!

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 23/12/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं.

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

फजिती !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/12/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
फजिती ! ३१ डिसेंबरला कुठल्यातरी एका मित्राच्या घरी जमून नव्या वर्षाचे स्वागत करायचे हे आमच्या मित्रमंडळाचे ठरलेलेच. आम्ही नऊ मित्र म्हणजे अगदी जवळचे आणि एकामेकांची टिंगल टवाळी हीही नित्याचीच. हसायला कोणाला आवडत नाही ? त्यात एखाद्याची फजिती झाली तर मग काही विचारू नका आणि ती जर ठरवून केली असेल मग तर काही विचारलायलाच नको. आम्ही सगळे यात माहीर होतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ना ती. अगदी केळ्याच्या सालीवरून एखादा माणूस घसरून पडला आणि जखमी झाला तरी बघणार्‍याची पहिली प्रतिक्रिया ही फिदीफिदी हसण्याचीच असते. मी व माझे मित्रही याला अपवाद कसे असतील ?

टिचकीत अभिजात इंग्रजी साहित्य - पुस्तक रुपात

लेखक यकु यांनी मंगळवार, 20/12/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकवेड्‍यांसाठी खुशखबर! इंग्रजीतील पुस्तकांसाठी अंतर्जालावर गुटेनबर्गसारखी अनेक ग्रंथालये आहेत. तसेच, पण इंग्रजीतील मूळ पुस्तके जशीच्या तशी (आणि फुकट, हे महत्त्वाचं ;-) ) ब्राऊझरमध्‍ये वाचण्‍यासाठी उपलब्ध असणारे ऑनलाईन ग्रंथालय सहज दिसले. हा त्याचा दुवा: http://openlibrary.org पुस्तके बर्‍याच ठिकाणी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकांसारखी पुस्तके नसून नुसती अक्षरांची खिचडी असल्याने वाचायला मजा येत नाही. या संकेतस्‍थळावर मूळ पुस्तकेच स्कॅन करुन अपलोड केलेली आहेत. कोणती कोणती पुस्तके आहेत हे सांगणे अवघड आहे, कारण इ.स.

अखेरचा पाठ

लेखक प्रास यांनी मंगळवार, 20/12/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जायला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढत चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार आणी कदाचित मारही, हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते.

पानगळ

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/12/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळ ! पाँडिचेरीची आपली एक स्वत:ची वेगळीच संस्कृती आहे. फ्रेंचांची वसाहत असल्यामुळे या भागात फ्रेंच आणि तामीळ संस्कृतीचे एक सुरेख मिश्रण आपल्याला आढळते. अजूनही बरीच फ्रेंच कुटूंबे येथे तग धरून आहेत. काही तरूणांनी येथील स्थानिक घरांशी घरोबा केल्यामुळे अजून एक मिश्र संस्कृती जन्माला आली आणि त्यात तामिळ सुसंस्कृतपणा आणि फ्रेंचांचा धाडसीपणा या गुणांचा एक सुरेख संगम आपल्याला यांच्या पुढच्या पिढ्यांमधे आढळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्रेंच लोकांची कलासक्तीही या पिढ्यांमधे पुरेपूर उतरली आहे. मी जे सांगतोय ती परिस्थिती साधारणत: १९४२-४३ सालातली.

वैष्णवेर क्रियामुद्रा....*

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 16/12/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या ईशान्य भागातील त्रिपुरा प्रदेशामध्ये अनेक वर्ष राजेशाही होती. गेल्या शतकामध्ये तिथे श्रीवीरचन्द्र माणिक्य यांचं राज्य होतं. महाराज वीरचन्द्र हे एक निराळंच व्यक्तिमत्व होतं. महाराज आचार-विचाराने वैष्णव होते. त्यांच्या घराण्यामध्ये गौर संप्रदायी भक्तीची परंपरा होती. राजकार्य करत असूनही ते यथाशक्ति यथासंभव भगवत् भजन करायचे. त्यांच्या राज्यकारभारावरही वैष्णव पद्धतीचा पगडा होता. ते स्वतःला विष्णुंचा प्रतिनिधी मानून कारभार करायचे. प्रजेवर पुत्रवत् प्रेम करायचे आणि कायम तिच्या क्षेमकुशलाची चिंता वाहायचे. त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूप प्रेम करायची.

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 15/12/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..