✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१० वी 'क' - भाग ४

क
किसन शिंदे यांनी
गुरुवार, 12/20/2012 - 13:29  ·  लेख
लेख
१० वी 'क' - भाग १ १० वी 'क' - भाग २ १० वी 'क' - भाग ३ थोडंस ओशाळत आणि सगळ्या वर्गाची नजर चुकवत कुलकर्णी दुसर्‍या रांगेतल्या पहिल्या बेंचवर जाड्या साठेच्या बाजूला जावून बसली. कुलकर्णीच्या येण्याने तात्पुरता खंडीत झालेला ओळखपरेडचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. आणि मराठीच्या पुस्तकावर असलेली माझी नजर वारंवार तिच्याकडे जाऊ लागली. तीला पाहताना आत-मनात प्रचंड उलथापालथ होत होती. दिसायला एकदम गोरीपान, रेशमी झुळझुळीत केसं, गहिरे आणि काळेभोर डोळे. कुलकर्णीने शाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यावर गारूड केलं होतं, मला ती भयंकर आवडली होती. समोरच बसलेल्या ठोंबरे बाई, बाजुचा पाल्या, संपुर्ण वर्ग या सगळ्याचा मला विसर पडला होता. संपुर्ण वर्गात मला फक्त माझं नि कुलकर्णीचंच अस्तित्व जाणवत होतं. वर्गातला एकेक जण उठून नाव सांगत होता, खाली बसत होता. ठोंबरे बाईंच वर्गावर लक्ष ठेवणं चालू होतं. वर्गातली मुलं-मुली हळूहळू आवाजात कुजबूजत होती. पाल्याही मराठीचं पुस्तक वाचण्यात गुंग होता. पण मी या कशातच नव्हतो. मी माझ्या स्वत:च्याच दुनियेत हरवलो होतो. अचानक सार्‍या वर्गाच्या खिदळण्याने भानावर आलो. सारा वर्ग खदाखदा हसत होता. चमकून पाल्याला विचारल "काय झालं?" "तीचं आडनाव काये माहीतेय का?" समोर उभ्या असणार्‍या मुलीकडे खुणवत पाल्या म्हणाला. "क्काये?" "सुचिता आगलावे!" "बोंबला तेजायला....आगलावे!!" "ह्या ह्या ह्या.." मी हि सार्‍या वर्गाच्या खिदळण्यात सामिल झालो. आगलावेच्या चेहर्‍यावर प्रचंड राग पसरला होता. आपल्या आडनावावर सारा वर्ग हसतोय म्हणून तीचा पारा होता चढू लागला होता. "आगलावे...म्हणजे आग लावण्याचीच कामं जास्त करत असणार" पोरांमधून कोणीतरी बोललंच. सारा वर्ग पुन्हा खळखळून हसला. आता मात्र आगलावे चिडली आणि एकदम तोर्‍यात बोलली"हो. आहे माझं आडनाव आगलावे, तुम्हाला काही प्रॉब्लेम?" "नाही तुम्ही लावा आग, पाणी टाकण्याचं काम आम्ही व्यवस्थित करू." पुन्हा कोणीतरी वात्रट पोरगं बोललंच. पोरं पुन्हा जोरात हसली. हसताना सहज कुलकर्णीकडे लक्ष गेलं तर ती हि तोंडावर रूमाल ठेऊन खुदूखुदू हसत होती. उफ्फ!! पार घायळ झालो तिच्या हसण्यावर. हसताना मध्येच चेहर्‍यावर आलेली केसाची बट ती बोटाने मागे सारण्याची तिची ती लकब. तेव्हा तर माझ्या ह्रदयातली धडधड अजूनच वाढायची. वर्गात फुल्ल धम्माल सुरू होती. पोरींची नावं सांगून झाली आणि पोरं उठून आपापली नावं सांगू लागली. "प्रसाद लाटणे" पोरांच्या रांगेतलं पाचव्या सहाव्या बाकावरचं पोरगं उठून उभं राहीलं. "हो क्का? मग पोळपाट कुठंय??" आगलावेने आपली आग दाखवायला सुरूवात केली आणि पुढील वर्षभरात काय घडेल याची छोटीशी चुणूकच दाखवून दिली. ओळखपरेड संपली आणि बाईंनी पिरेडचं टाईमटेबल लिहून दिलं. टोल पडले तरीही ठोंबरे बाई थांबल्या होत्या कारण पुढचा पिरेड ना.शाचा होता आणि ना.शाला असलेले आमच्या शाळेचे मुख्यधापक जाधव सर आज शिकवायला येणार नव्हते. हजेरी संपवली नि मराठीचं पुस्तक काढून ठोंबरे बाईंनी शिकवायला सुरूवात केली. सारा वर्ग आता शांतपणे ऐकू लागला होता. शिकवण्याकडे माझंही तसं लक्ष होतंच पण नजर अधून मधून कुलकर्णीकडे जात होतीच. शिकवणं झाल्यानंतर बाईंनी प्रत्येकाला धडा मनात वाचायला सांगितला. एवढं होईतो टोल पडले आणि तास संपला. एका हातात हजेरीचं रजिस्टर आणि पुस्तकं घेतं आणि दुसर्‍या हाताने चष्मा नीटनेटका करत ठोंबरे बाई निघून गेल्या. पुढचा पिरेड संस्कृतचा होता. कोणी आलं नव्हतं म्हणून मग सगळ्या वर्गाच्या गप्पांना ऊत आला. तसं दरवाजाकडे लक्ष होतंच. पाच-दहा मिनिटांनी प्रसन्न हसत महाजन बाईंनी वर्गात प्रवेश केला. बाई आम्हाला संस्कृताला आल्या होत्या. 'येस्स', 'स्सही', 'भारीच'. संपुर्ण वर्गात आनंद पसरला आणि प्रत्येकाच्या तोंडून असे शब्द बाहेर पडत होते. मनमोकळ्या स्वभावाच्या आणि मुलांना समजून घेणार्‍या महाजन बाई शाळेतल्या प्रत्येकाला आवडायच्या. त्यामुळेच कि काय त्यांच आमच्या वर्गाला संस्कृताला येणं हि खुप आनंदाची गोष्ट होती. महाजनबाई आहेत म्हटल्यावर आता संस्कृताचं काही टेशंनच नव्हतं. "ठोंबरे बाई का वर्गशिक्षक?" महाजन बाईंनी आल्या आल्या विचारलं. मग थोडा वेळ शांत बसून त्यांनी सुभाषितं शिकवायला सुरूवात केली. १० वी च्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं शिकवणं एवढंच झालं. शाळा त्यादिवशी लवकर सुटली. पाल्या नि मी घरी निघालो तसा आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. आषाढातला तो पाऊस तहानलेल्या भुमीवर वर्षाव करत तिला ओलचिंब करून तीचं मन तृप्त करत होता. आणि इकडे माझ्या मनात कुलकर्णीच्या आठवणींचे तुषार उसळून माझ्या अंतर्मनाला तृप्त करत होते. छत्री, रेनकोट काहीच नसल्याने भिजतच आम्ही घरी पोहचलो. अंतर्मनात काहीतरी मोठ्ठं खळबळजनक घडत असलं तरी गोडं वाटत होतं आणि म्हणूनच बाह्यरंगी मी थोडासा आनंदातच होतो. शाळेचा पहिलाच दिवस चुकवला नाही म्हणून आईसाहेब खुष झाल्या होत्या. गेल्या गेल्या तीला इंगळेबाईंचा किस्सा सांगितला आणि मोठमोठ्याने हसायला लागलो. "ह्या वर्षी शाळेला एकही दांडी मारणार नाही" रात्री सगळे एकत्र जमल्यानंतर मी डिक्लेरच केलं. "अर्रे व्वा! अभ्यासाचं महत्व शाळेच्या पहिल्याच दिवशी कळालं वाटतं कि आणखी काही भानगड आहे?" बंधुराजांनी खोचटपणा चालू केलाच. पण अण्णांनी नि आईसाहेबांनी माझ्या निर्णयाचं कौतूक केलं. "सच्चू, या वर्षी रिझल्टनंतर तुला माझ्याकडचं 'एच.एम.टी'चं घड्याळ बक्षीस मिळणार आहे." बांबानी मी खुप अभ्यास करून पास व्हावंच म्हणून चावी द्यायला सुरूवात केली. त्याचं कारण म्हणजे फक्त चावीवर चालणारं ते घड्याळ मला खुप आवडायचं. आता हे शिवधनुष्य पेलायचंच हा निर्धार मनाशी पक्का केला. शाळा सुरू होऊन आठवडा होत आला होता. मी आणि पाल्या रोजच्या रोज शाळेत जात होतो. त्यातल्या त्यात मी कुलकर्णीच्या अनामिक ओढीने रोजच्या रोज शाळेकडे ओढला जात होतो. पण या साल्या बापलेकरचा अजूनही पत्ता नव्हता. त्याने कदाचित शाळा सोडून दिली असल्याची किंवा बदलली असल्याची शक्यता मी पाल्याला बोलून दाखवली आणि त्याने ती लगेचच खोडूनही काढली. आणि एक दिवस शाळेच्या गणवेशात पाठीवर दप्तर टाकलेला बापलेकर एका नव्या कोर्‍या रेंजर सायकलसह आमच्या ठरलेल्या ठिकाणी माझी नि पाल्याची वाट पाहत उभा असलेला आम्हाला दिसला. क्रमश:

Book traversal links for १० वी 'क' - भाग ४

  • ‹ १० वी 'क' - भाग ३
  • Up
  • १० वी 'क' - भाग ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12544 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

तीला पाहताना आत-मनात प्रचंड

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/20/2012 - 13:43 नवीन
तीला पाहताना आत-मनात प्रचंड उलथापालथ होत होती. दिसायला एकदम गोरीपान, रेशमी झुळझुळीत केसं, गहिरे आणि काळेभोर डोळे. कुलकर्णीने शाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यावर गारूड केलं होतं, मला ती भयंकर आवडली होती.
Image removed.आयला अश्या पोरीच्या पेर्मात कोनीबी पडायच
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 12/20/2012 - 15:26 नवीन
वाचतेय, यावेळी उशीर झाला बर्का. पुढचा भाग पटापट लिही.
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन

कौस्तुभ खैरनार
गुरुवार, 12/20/2012 - 15:37 नवीन
कृपया आधीच्या भागांचे धागे द्यावे.
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/user

कवितानागेश
गुरुवार, 12/20/2012 - 15:54 नवीन
http://www.misalpav.com/user/14416/authored इथी या लेखकाचे सर्व लेखन सापडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

!

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/20/2012 - 16:05 नवीन
वो किसनद्येवा आधीचं भाग दिसंना झाल्यात व्हो. ते आधी द्येवा. आम्हीबी १० वी क मध्येच हुतो. पर शेन्ट भावेज मधी हुतो. समदी गडी मानसं. म्हनुन्श्यान ह्ये वाचाया ग्वाड वाटतया. येउंद्या फूडला भाग लगीच !
  • Log in or register to post comments

>>>>>>आम्हीबी १० वी क मध्येच

धुमकेतू
गुरुवार, 12/20/2012 - 16:29 नवीन
>>>>>>आम्हीबी १० वी क मध्येच हुतो. पर शेन्ट भावेज मधी हुतो. समदी गडी मानसं. म्हनुन्श्यान ह्ये वाचाया ग्वाड वाटतया. एक नंबर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

हे सगळे मला "शाळा " ह्या

धुमकेतू
गुरुवार, 12/20/2012 - 16:27 नवीन
हे सगळे मला "शाळा " ह्या पुस्तकासारखे का वाटत आहे ? म्हणजे "३ idiot " हा अमीर खान चा सिनेमा आणि "5 point someone" हे चेतन चे पुस्तक यात जसे थीम एक असून सुध्दा फरक आहे , ( ज्यांनी तो सिनेमा आणि ते पुस्तक वाचलेले आहे त्यांना लगेच कळेल ) आणि दोन्ही छान आहे , तसेच जर "शाळा " पुस्तक आणि किसन ची "१० वी क " असेल तर सरस होईन !!!!
  • Log in or register to post comments

आयला लयच भारी लिवलया सगळं

अनिल तापकीर
गुरुवार, 12/20/2012 - 17:14 नवीन
आयला लयच भारी लिवलया सगळं जुनं दिस आठवायला लागलं बुवा आनि सारं भाग एकत्र दिसतिल असंकाय तरी करा देवा, बाकी शैली एकदम फक्कड हाय बरकां
  • Log in or register to post comments

कुलकर्णी का शिरोडकर

अभ्या..
गुरुवार, 12/20/2012 - 17:17 नवीन
जाउ द्या ओ, एकतर ती कुलकर्णी का शिरोडकर ते विसरायला झाले होते. आता आलीय ना एकदाची. बघू आता सचिन्राव काय काय करतेत. देवा तुम्ही मात्र एवढा गॅप मारू नका.
  • Log in or register to post comments

वाचतोय. वाचनीय आहे.

अरुण मनोहर
गुरुवार, 12/20/2012 - 18:33 नवीन
वाचतोय. वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments

छान...

अनन्न्या
गुरुवार, 12/20/2012 - 19:27 नवीन
पहिले भाग वाचायचे आहेत पण हा भाग आवडला.
  • Log in or register to post comments

किसनद्येवांची "साळा" अवडली.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/20/2012 - 19:54 नवीन
किसनद्येवांची "साळा" अवडली. ;-)
  • Log in or register to post comments

एवढा मोठा गॅप का हो, शाळेचं

५० फक्त
गुरुवार, 12/20/2012 - 22:39 नवीन
एवढा मोठा गॅप का हो, शाळेचं बांधकाम काढलं होतं काय ट्रस्टिन??
  • Log in or register to post comments

शाळेत काय अनुत्तीर्ण वगैरे

प्यारे१
गुरुवार, 12/20/2012 - 23:09 नवीन
शाळेत काय अनुत्तीर्ण वगैरे झाला होतात काय आमच्यासारखे ? गॅप लय पडलाय म्हणून हो!
  • Log in or register to post comments

पुढचा भाग बी लैकर लिव्हा की.

बांवरे
Fri, 12/21/2012 - 05:32 नवीन
पुढचा भाग बी लैकर लिव्हा की.
  • Log in or register to post comments

पुढच्या भागात लेकरं लिव्हा..

वपाडाव
Mon, 01/07/2013 - 18:28 नवीन
पुढच्या भागात लेकरं लिव्हा.. असं वाचलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे

मस्तच हो बोकिल

इनिगोय
Fri, 12/21/2012 - 10:09 नवीन
मस्तच हो बोकिल :) आगलावे भारीच खटकेबाज दिसतेय! आणि हो, आधीचे धागे दिसते केल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

आधीच्या अनुभवावरून शेवटच्या

चाफा
Sun, 12/23/2012 - 00:03 नवीन
आधीच्या अनुभवावरून शेवटच्या भागाखेरीज प्रतिसाद देणारच नाही ;) हा प्रतिसाद मोजण्यात येऊ :D
  • Log in or register to post comments

किसन देव आम्हाला पावले व

निनाद मुक्काम …
Sun, 12/23/2012 - 02:01 नवीन
किसन देव आम्हाला पावले व आम्ही भरून पावलो पुढचा भाग लवकर येऊ दे .
  • Log in or register to post comments

उशीरा का असेना लिहिलास याचा

सुहास..
Wed, 12/26/2012 - 10:58 नवीन
उशीरा का असेना लिहिलास याचा आनंद आहे, शिवाय कथे मुळे स्मृती रंजन होते आहे ;)
  • Log in or register to post comments

पुभाप्र !!

सूड
Wed, 12/26/2012 - 11:03 नवीन
पुभाप्र !!
  • Log in or register to post comments

हा भागही आवडला.

शुचि
Wed, 12/26/2012 - 11:11 नवीन
हा भागही आवडला.
  • Log in or register to post comments

किसन देवा

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/30/2012 - 10:07 नवीन
लै झकास चालली आहे गोष्ट. इटरेस्टींग, पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. तेवढे ते पोरीचे अडनाव मात्र बदला. आडनाव आणि तीचे वर्णन यात प्रचंड विसंगती आहे. तीचे अडनाव पोंक्षे, लेले, गोखले असे एकारांती असते तर गोष्ट खरी वाटली असती. बाकी प्रेमात पडल्यावर माणुस आपली विवेक बुध्दी गमावतो हेही खरे आहे म्हणा. याच विचाराने हे वर्णन असले तर ठीक आहे. पण तसा खुलासा करा बुवा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हा पण जाम आवडला आता पुढचा

अनिल तापकीर
Sat, 01/05/2013 - 15:46 नवीन
हा पण जाम आवडला आता पुढचा तेवढा लवकर येउद्या
  • Log in or register to post comments

पु भा प्र

भुमन्यु
Mon, 01/07/2013 - 16:30 नवीन
पु भा प्र ------------- आयुश्य खुप सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर बनवणार आहे.
  • Log in or register to post comments

फुडलं कदी येनार?

आदूबाळ
Mon, 01/07/2013 - 23:38 नवीन
फुडलं कदी येनार?
  • Log in or register to post comments

हा फाऊल धरावा काय...

माम्लेदारचा पन्खा
Sat, 08/19/2017 - 16:00 नवीन
पुढचा भाग कधी येणार ?
  • Log in or register to post comments

कैच्याकै,

अभ्या..
Sat, 08/19/2017 - 17:52 नवीन
कैच्याकै, उद्या मोहेंजोदारो परत उकरशील आणि म्हनशील नर्तिका कुठाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हाहाहा

गामा पैलवान
Sat, 08/19/2017 - 20:14 नवीन
हाहाहा ! खोखोखो !! फिदीफिदीफिदी !!! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झकास .... आमचे बी दिवस आठवले

चौथा कोनाडा
Tue, 04/12/2022 - 18:07 नवीन
झकास .... आमचे बी दिवस आठवले :-)
  • Log in or register to post comments

हे सगळे लेखक असे का? कथेची

nutanm
गुरुवार, 04/14/2022 - 07:10 नवीन
हे सगळे लेखक असे का? कथेची उत्कंठा वाढवून गायब होतात. निदान लगेचच शेवटचा भाग टाकून पूर्ण करून तरी गायबवा ना स्वताःला. 2012 नंतर अजूनही शेवट नाहीच , ऊत्सुकता वाढली खहे आता तरी लेखक महाशयांनी शेवट टाकावा ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा