Skip to main content

कथा

"ती" - ३

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 23/07/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" - १ "ती" - २ ------------------------------------------------------------------------------ घाबरत घाबरत परत फोन केला, नेमका विजय ने उचलला. "हेलो" "हेलो, कोण हवय आपल्याला?" "नेहा आहे का?" "हो आहे आपण कोण?" "मी संदीप, मालती आत्याचा मुलगा!" "ओह, संदीप !! अरे किती दिवसांनी बोलतोय आपण?

आगळं वेगळं प्रेम

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 23/07/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रेम काय आहे ते आता मला कळलं." "प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो" इती मकरंद धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो,ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या बाजूला माजगावकरांचा बंगला आहे. मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत

खाडीतली खारफुटी दुनिया १

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 23/07/2015 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

"ती" - २

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 21/07/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" - १ पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो.

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी रविवार, 19/07/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त

द स्केअरक्रो - भाग ‍१२

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 19/07/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ११ द स्केअरक्रो भाग १२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अँजेलाचं घर नक्की कुठे आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी रॅशेलला तिच्याबद्दल मला जे काही माहित होतं ते सगळं सांगितलं. अगदी तिला पोएट केसबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलसुद्धा. तिचा ब्लॉग आहे हे मला माहित होतं पण मी तो कधीही वाचला नव्हता. आम्ही हेलिकॉप्टरने नेल्लीसला जायला निघण्याआधी रॅशेलने ही सगळी माहिती एल.ए.मधल्या एका एफ.बी.आय.एजंटला सांगितली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे संभाषण शक्यच नव्हतं.

महाभारत... (शतशब्दकथा)

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 18/07/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बरेच दिवस ते युध्द सुरूच होत. न भूतो न भविष्यति असा तो संग्राम होता. एकाहून एक भयानक आणि संहारक अस्त्र शस्त्र वापरली गेली. लाखो लोक मारले गेले, जे युद्धातून वाचले ते उपासमारी आणि रोगराईने मृत्युमुखी पडले. जेव्हा युद्ध संपले तेव्हा जमीन रक्ताने लाल झाली होती, ब्रम्हास्त्राच्या अति वापराने निर्माण झालेल्या काळ्यामिट्ट ढगांनी सुर्य देखील झाकोळला गेला होता, सगळीकडे अंधःकार पसरला होता. निसर्गाची अपरिमित हानी झाली होती. समस्त मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार होती" हे सगळे ऐकून चिंतातूर होत त्याने प्रश्न केला,"मला हे जमेल?" "मला पूर्ण विश्वास आहे.

"ती"

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 18/07/2015 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा संपूर्ण /अति काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. -----------------------------------------------------------------------
मे महिन्याची सुटटी पडली की मामाचा गाव हे ठरलेलं, तसा माझा स्वतःचा गाव हा मामाच्या गावापेक्षाही हिरवागार आणि शांत. माझ्या स्वतःच्या गावात लोकवस्ती अत्यंत कमी त्यामुळे शांतता जास्त. कदाचित लोकवस्ती अत्यंत कमी असल्यामुळेच हिरवाई जास्त होती. आमचं गाव म्हणजे मोठ्या गावाकडे जाणार्‍या एसटीचा थांबा. ओहळाच्या कडेकडेने असलेली मोजून बारा घरे. दोन घरांच्या मधे जी काही जागा होती तिथे नारळ आणि पोफळ (सुपारी).

द स्केअरक्रो - भाग ‍११

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 18/07/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १० द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता. “मि.

घरट्यातून पडलेलं पिलू

लेखक पथिक यांनी गुरुवार, 16/07/2015 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळी चालता चालता रस्त्याच्या बाजूला जांभळाच्या एका झाडाखाली पक्षाचं एक पिलू दिसलं. दोन-तीन फुटापर्यंत ते उडत होतं अन परत खाली बसत होतं. त्याच्या बाजूलाच एक बुलबुल येउन बसला. अस्वस्थपणे तो चिवचिव करत होता. बहुतेक त्या पिलाचा बाबा असावा. कारण त्याचा गळा लाल होता. मादी तशी असते कि नाही माहिती नाही. कोणी माणूस येताना दिसलं कि तो बुलबुल उडून झाडावर बसत होता अन मग परत खाली त्या पिलाजवळ येत होता. मी बाजूला पडलेली एक वाळकी डहाळी घेतली अन त्या पिलापुढे धरली. पिलू त्या डहाळीला पकडून बसलं अन मग मी ती त्या झाडाच्या फांदिजवळ नेली. पिलाने झाडाची एक बारीक डहाळी पकडली. मग मी बाजूला झालो.