Skip to main content

कथा

सबकाँशस मधलं काही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 06/08/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!! ---------------------------------------------------------- कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स. धस्खड्ज्ज्सब शजसजशब्सज्जश् ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह... तो नुकताच वाचायला शिकला आहे. रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे. वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला. तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही. त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही. जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री.

बुधा!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 06/08/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात! तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली! पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित!

शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)

लेखक चिगो यांनी बुधवार, 05/08/2015 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन ************************************************************************************************* आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात.. तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो.. ..पण सगळं सेट होतं ! आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस ! ...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल. तर... वाचकांना ही विनंती आहे की... कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका. धन्यवाद.

द स्केअरक्रो - भाग ‍१५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 01/08/2015 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १४ द स्केअरक्रो भाग १५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसून अगदी लक्षपूर्वक सिक्युरिटी स्क्रीनकडे पाहात होता. दोघेजण जिनिव्हाला त्यांचे बॅजेस दाखवत होते. त्याने बॅजेसवर झूम इन करून ते कोणाकडून आलेले आहेत हे पाहण्याआधीच दोघांनीही बॅजेस परत खिशात ठेवून दिल्यामुळे ते नक्की कोणत्या एजन्सीकडून आलेले आहेत ते कार्व्हरला समजू शकलं नाही. जिनिव्हाने तिच्यासमोरचा इंटरकॉम उचलला आणि तीन नंबर्स हलकेच दाबले. ती मॅकगिनिसच्या ऑफिसमध्ये फोन करते आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

संघर्षाचे दिवस

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 31/07/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर अनेक वर्षांच्या अथक परीश्रमांना नंतर जादुगाराचे नविन जादुंचे प्रयोग पुर्णत्वास पोहचले अन त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. " आहेस कुठे? दिवस फिरलेत बघ आपले. हे झोपडं मोडुन मजल्याच घर बांधु आपण. पक्कं! दागदागिन्यांनी मढवतोच की नाही तुला बघच तू " जादुगार उत्साहाने बायकोला म्हणाला. " अहो नाद सोडा ह्या भिकारड्या धंद्याचा. लोक टाळ्या खुप वाजवतात पण कितीही बाबा पुता करा पैसा सुटतो का त्यांच्या हातुन सांगा? तिथं तुमच्या जादुची मात्रा नाहीना चालत? चिल्या पिल्यांच्या खपाटीला गेलेल्या पोटा कडे बघा जरा अन दुसरा काहीतरी कामधंदा बघा " आत्यंतीक निराशेने जादुगाराची बायको म्हणाली. " बघ तर!

बस -- शतशब्दकथा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 29/07/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज क्युएचा शेवटचा दिवस. बरोबरचे सगळे अगोदरच इतर प्रोजेक्टवर गेलेले, हा एकटाच शेवटपर्यंत बसलेला. कोअर टीम मेंबर ना.. "हुश्श, हे दोन झाले की सुटलो, मग जरा क्युए सोबत बसलो के सगळे पूर्ण होईल. आज तरी ६ची बस पकडता येईल." तो मनातल्या मनात. तेव्हढ्यात फोन वाजला. "अरे तू आज लवकर येणारेस माहितेय ना?" "हो हो, निघतोच आता." त्याने भरभर ते दोन बग फिक्स केले, बिल्ड करून डीप्लॉय पण केले. पटपट निघून बसमधे गाणी ऐकत बसला. बरोबर सहा वाजता ड्रायव्हरने स्टार्टर मारला. बस प्रिमायसेसमधून बाहेर पडते तोवर फोन आलाच. "अरे बाबा निघालोय, पोचेन लवकरच". "मनीष मी विकास बोलतोय, बिल्डमधे मेजर इश्यू मिळालाय"

[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 28/07/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला. उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं . आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची .

साजरं ( शतशब्दकथा )

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 28/07/2015 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते. वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम. पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते. शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं. मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला...