Skip to main content

कथा

लघुकथा

लेखक मालविका यांनी मंगळवार, 13/09/2022 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लघुकथा अलक 1 आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या. गंधार बारा वर्षाचा झाला.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

जीवू

लेखक भागो यांनी सोमवार, 05/09/2022 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
“जीवू, आज माझी काही अपॉइंटमेंट आहे?” जीवू हा त्याचा जीवश्चकंठश्च असा मित्र कम पर्सनल असिस्टंट रोबो. “यस्स सर. आज तुम्हाला डॉक्टर बगाराम, हार्ट स्पेशिअलिस्ट M.D. FRCP. ह्यांची भेट घ्यायची आहे. संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी. रात्री नऊ वाजता “ला थाळी” मध्ये क्लाएंट बरोबर डिनर.” “दोनी अपॉइंटमेंटसाठी ड्रेस कोड प्रमाणे कपडे तयार आहेत?” “माझी सूचना अशी आहे कि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅज्युअल आणि डिनरसाठी कॅज्युअल एलेगंट असा ड्रेस ठीक राहील.” “जीवू, तू नसतास तर माझे काय झाले असते. अजून एक मे महिन्यात आराम करण्यासाठी गोव्याला जाईन म्हणतो.

खरकट्या मिसळीची गोष्ट

लेखक मीउमेश यांनी शनिवार, 27/08/2022 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !! प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी. सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही..

अलक १५ ऑगस्ट

लेखक मालविका यांनी सोमवार, 15/08/2022 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला.

तृष्णा भयकथा - ४

लेखक साहना यांनी गुरुवार, 11/08/2022 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
संदीपची गाडी भरधाव वेगाने ओल्ड सिटी रॉड वर जात होती. संदीप अतिशय शिताफीने वळणे घेत होता. त्या अरुंद रस्त्यावर तशी वर्दळ नव्हतीच. संदीप शहराच्या मुख्य भागी आला तेंव्हा त्याला आधीप्रमाणेच एक ओढ जाणवली. मेघदूत कॅफे चालू होता. गाडी सावकाश चालवत संदीप ने दोन्ही बाजूने पाहत कुरियर कंपनी चे ऑफिस शोधायचा प्रयत्न केला. आणि नंतर त्याला आठवले की ते ऑफिस अगदी शेवटी होते. बेलकीन अँड वॉरेन कुरिअर सर्विस. "अजब आहे" संदीप पुटपुटला. त्याला DHL ठाऊक होते, Bluedart ठाऊक होते. अगदी पाळंदे कुरियर सुद्धा ठाऊक होते पण बेलकीन अँन्ड वॉरेन अगदी प्रत्येक रेल्वेस्टेशन वर जसे व्हीलर बुक शॉप असते तसे इंग्रजी वाटत होते.

ओस का मोती

लेखक देवू यांनी रविवार, 07/08/2022 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली. हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे? रविवारचा दिवस, फोर्टमध्ये थोडीफार भटकंती करून स्टेशनवर आलो. रात्रीचे नऊ साडेनऊ झाले असतील, ठाणे लोकल बरीच रिकामी होती. मी ज्या डब्यात चढलो त्यात जेमतेम दहा बारा प्रवासी असतील. मी दारात उभा होतो.

तृष्णा भयकथा भाग -३

लेखक साहना यांनी गुरुवार, 04/08/2022 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
तृष्णा भयकथा भाग -३ जुन्या शहरांत संदीपला जो अनुभव आला तो त्याने चित्राला कथन केला नाही. नक्की का ? ह्या प्रश्नाचे उत्तर खरे तर त्याला सुद्धा ठाऊक नव्हते. चित्रा तशी घाबरणारी नव्हती. पण त्या मुलीच्या संदर्भांत आपण तिच्या सोबत चहा वगैरे पिणे तिला नक्की कसे वाटले असते हे त्याला ठाऊक नव्हते. त्याशिवाय अपघात झाला हि गोष्ट सुद्धा त्याला लपवणे आवश्यक वाटल. तिचा फोन काय पण नाव सुद्धा मी विचारायला विसरलो ह्याची खंत त्याला होती. पण मेघदूत कॅफे मध्ये ती असते त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याचा योग येणारच होता. संदीपने मफतलाल ला फोन करून तिच्या दुचाकीची चौकशी केली होती.

तृष्णा भयकथा - भाग २

लेखक साहना यांनी मंगळवार, 02/08/2022 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: http://misalpav.com/node/50502 संदिप चित्रा चे घर ज्या भागांत होते त्याला जॅकसन कॉलोनी म्हणायचे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तलावाच्या बाजूला राहण्यासाठी बांधलेली हि घरे. प्रशस्त रुंद रस्ते,  त्याला भले मोठे  फुटपाथ, त्याच्या दोन्ही बाजूनं झाडे. जॅक्सन कॉलोनी मध्ये कदाचित २५-३० घरे असतील. फारतर दुमजली. कॉलोनी रोड संपतो तिथून कंपनी कॉलोनी सुरु होत असे, ३-४ ते ७ माजली पर्यंत बिल्डींग्स. इथे बहुतेक खाण कंपनीचे अधिकारी, सरकारी नोकर इत्यादी लोक राहत.

हाजीर हो !

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 31/07/2022 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हाजीर हो ! ... पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या ,तरूण आणि रुबाबदार पस्तीशीतील राजन काळे नी आपली गाडी आपल्या पार्किंग मध्ये लावली. आपला टाय जरासा सैल केला . समोरच्या आरशात बघून आपले काळेभोर केस जरा सारखे केले. गाडीतून बाहेर पडून ,मागच्या सीट वरून आपली लॅपटॉप ची बॅग घेतली . आपल्या खिशातील मोबाईल काढून तो चालू केला. आजच्या दुपारच्या मीटिंग मध्ये त्याने तो बंद केला होता. मेघनाचे एक दोन मिस काल्स होते. एक दोन मेसेज सुद्धा होते. आता घरी जातोच आहे तेव्हा बोलू असा विचार करून तो पुढे निघाला. सहज घड्याळात बघितले तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आज जरा जास्तच उशीर झाला होता.